या मामाला विसरू नका -आमदार दत्तात्रय भरणे
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे :इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे १ कोटी ४५ लाख रुपये या विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. वायरलेस चौक ते नावजीबुवा मंदिर एक कोटी रुपये श्री काळभैरवनाथ विद्यालय कळस येथे वर्गखोलेंच्या बांधकामासाठी 45 लाख रुपये या विकास कामांचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी दत्तात्रय भरणे यांनी काळभैरवनाथ विद्यालयाचे स्नेहसंमेलनाचे देखील उद्घाटन केले .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी खूप शिका, कष्ट करा, खुप खेळा ध्येय निश्चित करा ,आई-वडिलांचे संस्कार विसरू नका, असे आवाहन करत असताना त्यांनी ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना व सभास्थळी उपस्थित असणारे सर्वांना आणखी एक आवाहन केली की या मामाला देखील विसरू नका . तसेच आमदार भरणे यांनी विद्यार्थ्यांसोबत खाली बसुन वार्षिक स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे ,सचिन सपकळ , संदेश देवकर, दीपक जाधव, प्रशांत पाटील, कळशी गावचे सरपंच रूपाली गोलांडे, उपसरपंच विजय रेडके, अमर गाडे ,सचिन खामगळ, अशोक शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र गोलांडे यांनी केले.
