शिवराज गावडे यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया उपाध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील आमदार दत्तात्रय भरणे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते तरंगवाडी गावची तंटामुक्ती अध्यक्ष पै. शिवराज गावडे यांची इंदापूर तालुका सोशल मीडिया उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
गंगावळण येथील सभेमध्ये हे निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. यावेळी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, इंदापूर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकाळ ,अतुल झगडे, संदेश देवकर, शिवाजी तरंगे, शुभम निंबाळकर ,प्रशांत पाटील, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
