इंदापूरच्या शेतकऱ्यांसाठी शेती सिंचनासाठी ४ मार्च पासून खडकवासला कालव्यांतून आवर्तन सोडले जाणार - आमदार दत्तात्रय भरणे यांची मागणी पालकमंत्री अजित पवार यांनी केली मान्य.. प्रतिनिधी दत्ता पारेकर




इंदापूरच्या शेतकऱ्यांसाठी शेती सिंचनासाठी ४ मार्च पासून खडकवासला कालव्यांतून आवर्तन सोडले जाणार - आमदार दत्तात्रय भरणे यांची  मागणी पालकमंत्री अजित पवार यांनी केली मान्य..


       प्रतिनिधी दत्ता पारेकर                                     

पुणे : निरा डाव्या कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी यापुढील काळात उन्हाळी हंगामातील दोन आवर्तने सोडली  जाणार आहेत. तर नवा मुठा उजवा खडकवासला कालव्यातून येत्या  ४ मार्चपासून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

आज शनिवार (दि.२४) रोजी पुणे येथे पालकमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार राहुल कुल, कार्यकारी संचालक अतुल कपोले, पुणे पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री. गुलाने, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप,  कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे,  पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे व इतर पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते.

आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी उन्हाळी दोन आवर्तन सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी  यावेळी बैठकीत केली . उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन संपल्यानंतर खडकवासला प्रकल्पातील पाण्याचा अंदाज घेऊन आमदार भरणे यांच्या मागणीनुसार दुसरे आवर्तन उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री श्री. अजित पवार यांनी दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने