तू जळते दिव्या प्रमाणे रमा,मी उभा पेटलो आहे...!
मुक्तीभूमी वाचनालय-अभ्यासिकेत माता रमाईला पत्र अभिवाचन,काव्य-गीत,एकपात्री प्रयोगातून अनोखे अभिवादन
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येवला संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय तथा राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्यातील पत्रव्यवहार अभिवाचन कार्यक्रम "प्रिय रामू" , "मी रमाई बोलतेय" हे एकपात्री नाट्य व काव्य-गीत-गझल सादरीकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीताताई वाहूळ होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सिने पार्श्वगायक जयेश खरे हे उपस्थित होते.
जीवनातील कौटुंबिक, सामाजिक,आर्थिक-जातीय संघर्षाला तोंड देत प्रज्ञासूर्याची सावली होऊन,बाबासाहेबांच्या संघर्ष शील जीवनाच्या दिव्याची वात होऊन रमाई जगल्या उभयतांच्या राष्ट्र उभारणीत वाटा मोठा असल्याचे मत व्यक्त करून सांगू किती व्यथेला मी पुरता छळलो आहे,ती जळते दिव्या प्रमाणे रमा मी उभा पेटलो आहे असाच जीवन प्रवास बाबासाहेब व रमाई यांनी केला असे मत मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व कर्डक अभ्यासिकेचे संस्थापक प्रा.शरद शेजवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मांडले.
बाबासाहेब व रामाईंच्या पत्रव्यवहाराच्या वाचनातून उभयतांच्या नात्यातील नाजूक,हळवा, जबाबदारी, आणि बांधिलकी सामाजिक उत्तरदायित्व याचे भान देणारे प्रसंग वाचनातून त्यांचा जीवणानुभव श्रोत्यांना झाला.मी रमाई बोलते हे एकपात्री नाटय आदिती सोनवणे यांनी सादर केले अप्रतिम असे सादरीकरण,ओघवती भाषा उपस्थितांचे मने जिंकून गेली.सर्वांसमोर माता रमाईच उभ्या केल्या.राजरत्न वाहूळ यांनी प्रिय रामू ह्या साहित्यिक योगीराज बागुल,डॉ.यशवंत मनोहर यांच्या रमाई कादंबरीतील पत्र व प्रसंग वाचन केले यांतील साहेब व रमाई यांचा पत्रव्यवहार मन हेलावून टाकणारे होते.
गायक जयेश खरे,प्रा.शरद शेजवळ, गायक मनोज गुंजाळ,साक्षी गुंजाळ यांनी रमाईच्या जीवनावरील गीते सादर केले,अजिज भाई शेख यांनी रमाईं वरील गझल आणि शेर सादर केले त्याचप्रमाणे नानासाहेब पगारे व विकास वाहूळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सुप्रसिद्ध सिनेपार्श्व गायक जयेश खरे यांना लोककवी वामनदादा कर्डक यांचा मोहोळ हा काव्य गीत संग्रह भेट देण्यात आला. कार्यक्रमास विश्वास खरे, विकास वाहुळ,डॉ.भाऊसाहेब केदारे,नानासाहेब पगारे,बी.डी.खैरणारसर, अभिमन्यू शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.सिद्धार्थ गुंजाळ,संकेत गुंजाळ यांनी वाद्य साथ सांगत दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तीभूमी वाचनालयाचे संस्थापक प्रा. शरद शेजवळ सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ,आभार बी.डी. खैरनार यांनी मानले.प्रदीप पगारे, सिद्धार्थ शिंगाडे, भावना पगारे, शुभम गायकवाड, दीक्षा आहिरे, रोशनी पगारे, यश गायकवाड, ललित भांबेरे, सचिन गरुड, पवन दळे, जगदीश वेंधे आदी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यकामस मोठ्या संख्येने वाचक,विद्यार्थी उपस्थित होते.
