थाळनेरला मानव विकास मिशन अंतर्गत ९० विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप थाळनेर (प्रतिनिधी)




थाळनेरला मानव विकास मिशन अंतर्गत ९० विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप
थाळनेर (प्रतिनिधी)

शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील अन्नपूर्णादेवी विद्या प्रसारक संस्था संचलित श्रीमती जयश्रीबेन अमरीशभाई पटेल माध्यमिक विद्यालयातील ९० विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थाळनेरचे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच प्रशांत निकम होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन शरदबापू वाडीले, संस्थेचे सचिव निळकंठ वाडीले, शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी,माजी मुख्याध्यापक प्रवीण शिरसाठ, संस्थेचे संचालक बी.डी. तमखाने व माजी क्लार्क अनिल चाचरे होते. मान्यवरांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या ९० विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना सायकल मिळाल्यामुळे शाळेत येण्यासाठी सोयीस्कर होणारे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक डी जी पाटील, ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडीले, राकेश पाटील,महेंद्र बाविस्कर, प्राध्यापक शामकांत पाटील, प्राध्यापक विजय झुंजारराव,सुरेश वाडीले शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक कोठावदे यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने