तलाठ्यास दादागिरी, जीवे ठार मारण्याची धमकी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात गौण खनिज चोरी हा प्रकार सध्या जोमाने उदयास येत असून आता चोरट्यांची मुजोरी वाढली असून ती आता अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे.
सध्या गौण खनिज प्रकरणात महसूल विभागाकडून धडक कारवाई केली जात असून अनेकांना दंड थोटावला आहे. त्यामुळे गौण खनिजाची चोरटी करणाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
शिरपूर तालुक्यातील जवखेडा सजा मधील नवेलोंढेरे येथे वाळू तस्करांनी थेट तलाठ्यांवर दादागिरी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली, व मारहाण केली म्हणून आणि गौण खनिजाचे चोरटी वाहतूक केली म्हणून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुरेश तुकाराम ठाकरे वय वर्षे 35 तलाठी शिरपूर तहसील कार्यालय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फिर्यादीत त्यांनी असे नमूद केले आहे की ते शासकीय कर्तव्यावर असताना जवखेडा सजा येथील नवे लोंढेरे शिवारातून गौण खनिजाची चोरटी वाहतूक होत असल्याबाबतची गोपनीय बातमी प्राप्त झाली म्हणून त्यांचे सहकारी तलाठी
अनिरुध्द गोकुळ बेहळे असे आम्ही दोघे नवे लोंढरे गावातील तापी नदीपात्रात पाहणी करणे करीता गेलो होतो, तेव्हा नवे लोंढरे गावाकडून नदीपात्राकडे जाणाऱ्या रोडने यांचे प्लॉटींग पडलेल्या शेताजवळील आम्ही जात असतांना गावापासुन सुमारे 500 मी. अंतरावरील नारायण बाकडे यांचे रस्त्याने एक लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर नदीपात्राकडुन वाळुची चोरी करुन ट्रॉलीमध्ये भरुन घेऊन येतांना दिसला, तेव्हा मी माझे सहकारी तलाठी अनिरुध्द बेहळे असे आम्ही दोघांनी सदर ट्रॅक्टर थांबविला आणि त्यावरील चालकाला खाली उतरवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सांगण्यास नकार दिला. यांनतर आम्ही वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची पाहणी केली असता त्यावर नंबरप्लेट नसल्याने टॅक्टरचा चेसीस क्रमांक NKF6CBE0260 असा असल्याचे दिसले. यानंतर आम्ही कारवाईसाठी मा. तहसिलदार यांना फोनद्वारे कळवुन नमूद चेसीस क्रमांकाचा ट्रॅक्टर तहसिल कार्यालय शिरपुर येथे घेऊन जाणेसाठी निघालो तेव्हा तेथे ट्रक्टर मालक वकील गोसावी (पूर्ण नाथ माहित नाही) रा. बोराडी, ता. शिरपुर आणि हंसराज पाटील, रा. बोराडी, ता. शिरपुर असे दीघेजण तेथे आले आणि आम्हाला दोघांना शिवीगाळ करून बोलू लागले की, पुन्हा जर इकडे कारवाईसाठी आले तर दोघांनाही ट्रॅक्टस्खाली दाबुन मारून टाकु, यानंतर मी त्यांना आम्ही शासकीय कामकाज करत असुन तुम्ही आमच्या कामात अडथळा करु नका असे आवाहन केले. तेव्हा वकील गोसावी आणि हंसराज पाटील यांनी माझ्या शर्टची कॉलर पकडुन शर्ट फाडुन दोघांनीही मला हाताने मारहाण केली, यावेळी माझेसोबत असलेले तलाठी अनिरुध्द बेह यांनी मला त्यांचेपासुन सोडविले तेव्हा त्यांनी शिवीगाळ करुन तेथेच वाळुने भरलेली ट्रॉली खाली ओतुन दिली आणि जबरदस्तीने तेथुन नमुद चेसीस क्रमांकाचा ट्रॅक्टर घेऊन गेले. याबाबत आम्ही तात्काळ तहसीलदार शिरपूर यांना माहिती दिली.
म्हणून माझी वरील सर्व आरोपी यांच्या विरोधात कायदेशीर फिर्याद आहे की यांनी आम्ही शासकीय कर्तव्यावर असताना मला दमदाटी करून जीवेत हार मारण्याची धमकी दिली शिवाय
अवैधपणे विनापरवाना वाळुची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टरमध्ये वाळु भरुन वाहतुक करतांना मिळुन आला. म्हणुन माझी त्याचेविरुध्द भारतीय दंड विधान कलम 379 सह महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 कलम 48 (7), (8) अन्वये कायदेशीर फिर्याद दिली आहे.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस पथकाकडून केला जात आहे.
