एचपीटी आर्ट्स व आर वाय के सायन्स महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*.




एचपीटी आर्ट्स व आर वाय के सायन्स महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*.

एचपीटी आर्ट्स व आर वाय के सायन्स महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या बक्षीस वितरण सोहळ्यास महाविद्यालयाच्या प्राचार्या मृणालिनी देशपांडे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे गंगापूर पोलीस स्टेशन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे  होत्या.या कार्यक्रमाची गोखले एज्युकेशन सोसायटी गीताने सुरवात करण्यात आली.अध्यक्षीय भाषण झाले. तद नंतर प्रमुख पाहुणे गंगापूर पोलीस स्टेशन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षक व विद्यार्थी तसेच विद्यार्थी व पोलीस याविषयी सर्व विद्यार्थ्यांना थोडक्यात सरळ सोप्या भाषेत माहिती दिली. त्याचबरोबर आपले महाविद्यालयीन अनुभव थोडक्यात अवर्जून सांगितले. व पुढील बक्षीस वितरण कार्यक्रम सावित्रीच्या लेकी यांच्यापासून बक्षीस वितरणास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास  महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. मृणालिनी देशपांडे, उप प्राचार्य डॉ. पी एस देशपांडे उपप्राचार्य डॉ. चौरसिया आयक्युएसी कॉर्डिनेटर डाॅ. प्रणव रत्नपारखी विद्यार्थी विकास मंचचे डॉ. खलाणे तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  बक्षीस आर्थिक सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. मृणालिनी देशपांडे तसेच प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने