शिरपूर शहर पोलीस ठाण्यात निरोप, सत्कार व शुभेच्छा समारंभ संपन्न
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पोलीस स्टेशन मधील कार्यरत बदली झालेले तत्कालीन पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांना आपल्या शिरपूर शहर पोलीस स्टेशन मधील कार्यकाळाच्या समारोप करून इतरत्र बदली झाल्याने त्यांच्या निरोप समारंभ , शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 31 वर्ष सेवा बजावलेले पोलीस कॉन्स्टेबल लादूराम चौधरी यांच्या सेवापूर्ती सोहळा आणि शिरपूर शहर पोलीस स्टेशनला नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांच्या स्वागत समारंभ असा त्रिवेणी संगम असलेला कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी शिरपूर शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध पदाधिकारी, शिरपूर तालुक्यातील पोलीस पाटील , पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित त्यांनी शहराला लाभलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत गौरव उद्गार काढून त्यांच्या कार्याची स्तुती केली. आगरकर यांनी शिरपूर शहराला आपलेसे करून घेतले होते आणि कधी कठोर तर कधी नरम भूमिका घेऊन त्यांनी या शहराला कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे या शहराचे त्यांच्याशी ऋणानुबंध जोडले होते निरोप देताना उपस्थित नागरिकांच्या सोबत निरोप घेणारे, आणि सेवापुर्ती करून सेवानिवृत्त होणारे दोन्ही अधिकारी देखील भाऊक झाले होते. यावेळी उंटावद गावाचे पोलीस पाटील, पत्रकार राजू मारवाडी पत्रकार विजय सिंग राजपूत, रज्जा कुरेशी राजू शेख इरफान खाटीक एडवोकेट अमित जैन, विकास सेन इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सत्कारमूर्तींनी देखील आपली भावना व्यक्त करत शिरपूर सारखे प्रेम करणारे लोक आम्हाला आमच्या आयुष्यात भेटली नाहीत, शिरपूर हे एक वेगळे रसायन आहे येथील नागरिक आणि नेते यांच्यात कमालीची सामंजस्यता असून यांच्यात अनोखा धार्मिक भाईचारा आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांच्या निरोप समारंभ संपन्न होऊन , पोलीस हेडकॉन्स्टेबल चौधरी यांच्यासह पत्नीच सत्कार करून त्यांना देखील निरोप देण्यात आला. आणि नवनियुक्त पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांच्या देखील स्वागत समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी शिरपूर शहरातून नगर परिषदेचे सीईओ तुषार नेरकर यांना त्यांची बदली झाल्याने त्यांना सेवापुर्तीचा निरोप घेऊन भावी काळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक यांनी यापूर्वीच्या अधिकाऱ्यांपेक्षा अधिक चांगले काम करून दाखवेल असा विश्वास व्यक्त करून दाखवेल असा विश्वास व्यक्त केला व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत निकवाडे यांनी केले. याप्रसंगी शिरपूर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.



