शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ध्यास प्रदर्शित
शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात चित्रपटाचे शूटिंग व स्थानिक कलाकारांना वाव
शिरपूर प्रतिनिधी - चित्रपट सृष्टीत जाऊन काम करावे अशी प्रत्येक कलाकाराची अपेक्षा असते मात्र ही अपेक्षा निवडक लोकांची पूर्ण होते. शिरपूर तालुक्यातील चित्रपट सुशिक्षित काम करण्याची ही अपेक्षा या चित्रपटामुळे पूर्णत्वास आली असून स्थानिक कलाकारांच्या प्रमुख भूमिका ध्यास या चित्रपटातून साकारल्या गेले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची बहुतांशी शूटिंग ही शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात करण्यात आले होते. यावेळीस आमदार काशीरामजी पावरा व लोकप्रतिनिधी भूपेश भाई पटेल यांनी या चित्रपटात प्रोत्साहन दिले होते व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन त्यांना मदत पुरवले होती. शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आता ओटीपी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सुरुवात झाली असून त्याचे दोन भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत.
स्थानिक कलाकारांना याच प्राधान्य दिल्याने या चित्रपटाची तालुका भरात विशेष प्रतीक्षा होती. या चित्रपटाची शूटिंग शिंदखेडा तालुक्यातील आशादेवी मंदिरावर तर शिरपूर तालुक्यातील काही भागात करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक बिपिन भाई जाधव असून या चित्रपट पटा बाबतची अधिकची माहिती यातील प्रमुख शिरपूर येथील कलाकार निलेश राजपूत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मुंबई येथील धर्मा पिक्चर ने सदरच्या चित्रपट तयार केला असून या चित्रपटात शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित कथानक घेण्यात आले आहे.
सदर चित्रपटात स्थानिक कलाकार म्हणून कलावंत एसटी पाटील ज्ञानेश्वर जाधव विजय पवार विजय मालवे निलेश राजपूत भूपेंद्र महाजन सागर पवार सागर महाले दीपेश चौधरी जयेश माळी हरपाल राजपूत मनोहर पाटील इत्यादी कलाकारांनी काम केले आहे. शिवाय मुंबईचे कलावंत मकरंद गोस्वामी राजकिरण जाधव भूषण दीप्ती सावंत यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.
खानदेशी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि हा चित्रपट पाहून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन चित्रपटातील कलाकार निलेश राजपूत यांनी केले आहे.
