अल्पवयीन आदिवासी मुलीची छेडछाड करणा-या आरोपींवर पोस्कोचा गुन्हा दाखल आरोपींना बडतर्फ करा बिरसा फायटर्स आक्रमक




अल्पवयीन आदिवासी मुलीची छेडछाड करणा-या आरोपींवर पोस्कोचा गुन्हा दाखल

 आरोपींना बडतर्फ करा बिरसा फायटर्स आक्रमक 

शिरपूर - 

शिरपूर तालुक्यातील मुखेड गावातील आश्रम शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला असून रक्षकच भक्षक झाला अशी काहीशी परिस्थिती येथे दिसून आले आहे. पालकांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्टकोच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून विहितांच्या तक्रारीनुसार या शाळेतील दोन सामान्य अल्पवयीन मुलीं सोबत स्त्री मनाला लज्जा येईल असे वर्तन केल्याने त्यांच्या विरोधात विनयभंग व पोस्को चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेच्या आदिवासी बांधव व विविध संघटनांकडून निषेध व्यक्त होत असून या आरोपींना तात्काळ बर्थतर्फ करा आणि या संस्थेची मान्यता रद्द करा अशी मागणी बिरसा फायदा संघटनेने केले आहे.

 शिरपूर तालुक्यातील मुखेड गावात   एक आश्रम शाळेला मान्यता दिली आहे. त्या संस्थेत आदिवासी भागातील मुले मुली शिक्षण घेत आहेत.त्या संस्थेत  कार्यरत  शिपाईने व शिक्षकाने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करत मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. असा त्यांच्यावर आरोप आहे. त्या मुलींनी सदर घटनेची माहिती लॅबोरेटरी शिक्षकांकडे दिली. तक्रार केली होती, परंतु त्या  वर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.म्हणून मुलीनी सदर घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली. पालकांनी व गावातील सरपंच व ग्रामस्थांनी संबंधित संस्था वर जाऊन विचारपूस केली. तेव्हा संस्था येथून आरोपी फरार झाला होता. आरोपींना फरार होण्यात संस्थाचालकांनी मदत केली असं देखील आरोप बिरसा फायदा संघटनेने निवेदनातून केला आहे .

 मुलींनी सदर घटनेची माहिती  या शिक्षकांना दिले होते मात्र त्यांच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही अशी देखील तक्रार आहे. मात्र मुलींनी पालकांना सदर घटनेबाबत माहिती दिल्यानंतर मुलींचे गावातील लोकांनी त्या लॅबोरेटरी शिक्षक व शिपाई यांना पकडून शहादा पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आले होते.

सदर घटना शिरपूर तालुक्यात घडली असल्याने पीडित मुलीच्या पालकांनी दिनांक २३ रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक के.के पाटील यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य पाहता तात्काळ त्यांची तक्रार नोंद करून घेत संबंधित आरोपींच्या विरोधात विनयभंग व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकाच्या विरुद्ध शहर पोलिस अन्य ठाण्यात भादंवि कलम ३५४, ३५४(अ), पोक्सो ८, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा  कलम ३(१) (डब्ल्यू) (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे या प्रकरणी अधिक  तपास करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने