बभळाज ग्रामपंचायत तर्फे हळदकुंकू व महीला समुपदेशन कार्यक्रम संपन्न
बभळाज/प्रतिनिधी
बभळाज ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता अजमल जाधव यांनी गावात हळदकुंकू व महीला समुपदेशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा विचार करुन त्यांनी लागलीच दामिनि पथकाच्या पीएसआय छाया पाटील याच्याशी संपर्क साधुन चर्चा केली व दि.८ फेब्रुवारी गुरुवार रोजी बभळाज ग्रामपंचायत पटांगणात हळदकुंकू व महीला समुपदेशनचा कार्यक्रम घेण्यात आला.अध्यक्षस्थानी शिरपुर शहर व दामिनी पथकाच्या अधिकारी पीएसआय छाया पाटील होत्या.प्रमुख पाहुणे थाळनेर पोलीस स्टेशनचे सपोनि दिपक पावरा, जि.प.सदस्या सौ.बेबीबाई पावरा,पं.स.सदस्या सौ.रेखाबाई जाधव, सरपंच योगीता जाधव व दामिनी पथकाच्या महीला कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थितांच्या हस्ते द्विप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी उपस्थितांचा सत्कार सरपंच योगीता जाधव व त्यांच्या सदस्यांनी केले.सपोनि दिपक पावरा यांचा सत्कार माजी तंटामुक्त अध्यक्ष अजमल जाधव यांनी केले.तदनंतर महिलांकडून हळदकुंकूचा कार्यक्रम करण्यात आले.विद्यार्थीनींना व महीलांना कोणी त्रास देत असेल छेड काढत असेल तर किंवा इतरांना त्रास देत असतील तर ११२ हा नंबर डायल करून पोलिसांना कळवले म्हणजे तुम्हाला तात्काळ पोलिसांची मदत मिळेल.महीलांना सुरक्षित वाटावे म्हणुन पोलीस दीदी ही संकल्पना राबविण्यात येत आहे.महीलांनी सुरक्षित राहता यावे व वाटावे या बाबतीत विवीध उदाहरणे देऊन दामिनी पथकाच्या अधिकारी छाया पाटील यांनी समुपदेशन केले.जि.प.सदस्या बेबीबाई पावर सह उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा.तंटामुक्त समिती अध्यक्ष अजमल जाधव आणि पोलीस पाटील नितीन जाधव व ग्रा.पंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या वेळी ग्रा.पं.सदस्या, विवीध संस्थांच्या आजी माजी महीला पदाधिकारी,गावातील महिला, बचतगटाच्या महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
