शिरपूर बस आगारप्रमुख व शिरपूर शहर पोलिस स्टेशनला मनसे कडून निवेदन
शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर बस स्थानकावर नियमित ये-जा करणारे तसेच लग्नसराई, यात्र व मोहत्सव कालावधीमध्ये अतिशय मोठ्याप्रमाणात गर्दी असते, त्यातच राज्य सरकारने प्रवास शुल्कात महिलांना 50 टक्के सवलत लागू झाल्यापासून बस स्थानकावर महिलांची खूप अफ़ाट गर्दी वाढली आहे. त्याच प्रमाणात चोरांचा बस स्थानक परिसरात सुळसुळाट वाढण्याची देखील शक्यता नाकारता येणारी नाही. तसेच काही व्यक्ती कडून गर्दीचा फ़ायदा घेत सभ्य व उच्चप्रतिटीत घरातील महिलांच्या गुप्त अवयवांना स्पर्श करुन छेडण्याचा प्रयन्त होतो. मात्र सदर महिला आपल्या इर्भीतीपाई तक्रार करत नसल्याने अश्यांचा उत बसस्थानक परिसरात आलेला आहे. त्याच्यावर नियंत्रणासाठी बस स्थानकावर ठिक-ठिकाणी कॅमेरा लावण्यात यावेत असे निवेदनात म्हटलेले आहे.
तसेच धुळे व शिंदखेडा कडून येणा-या बसेस ह्या गुजराथी कॅ|म्पलेक्सच्या जवळ चौकाच्या अगदी काठावर उभे केले जातात. त्यातच याठिकाणी इतर वहाने, दुकाने पाई चालणा-यांची इत्यादीची गर्दी मोठ्याप्रमाणवर असतांना बस वहातूकीच्या मुख्य चौकाजवळ बस थांबा नसतांना बस हकनाक वहातूकीस अडचण निर्माण केली जाते. त्यामुळे एकतर त्या मार्गाने बस वहातुक बंद करावी अथवा प्रवासीसाठी बस थांबा जवळच असलेल्या पोट्रोलपंपा जवळ देण्यात यावा असे निवेदन बस आगारप्रमुख व शिरपूर शहर पोलिस स्टेशनला देण्यात आले. सदर निवेदन देते वेळीस राकेश नवनित चौधरी (जिल्हा अध्यक्ष मनसे) पुनमचंद आनंदा मोरे ( तालुका अध्यक्ष मनसे) छोटू राजपूत (जिल्हा संघटक मनवासे) सोनू राजपूत (जिल्हा अध्यक्ष मनविसे) पंकज मराठे (शहर अध्यक्ष मनसे) राकेश पाटील (तालुका उपाध्यक्ष मनसे) अमोल गुजर (उपाध्यक्ष) किरण माळी (संघटक), इमरान पिंजारी, प्रविण पाटील, अमरान पिंजारी, विवेक पाटील आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनामुळे प्रवासी व स्थानिक महिलावर्गाने मनसे कार्यकर्त्यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
