बालविवाह विरोधी लढा-
मुलांच्या सक्षमतेच्या दिशेने...
वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा( प्र.न.) ता. शिंदखेडा जि. धुळे येथे एस.बी.सी. व युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने " बालविवाह विरोधी लढा "- मुलांच्या सक्षमतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी इ. 6 वी ते इ.10वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय मुख्याध्यापिका श्रीम. पी.पी. महिरे - वाघ उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस्. एस्. पाटील, ज्येष्ठ उपशिक्षक सी. झेड्. कुवर, पी.बी. विसपुते, श्रीम. मंगला डी.कुवर, एस् .एन्. पाटील, के. एच्. पाटील, नितीन पाटील, जितेंद्र राजपूत उपस्थित होते.
बालविवाह निर्मूलन कार्यशाळेचे मुख्य वक्ते राज्य आदर्श शिक्षक एन् .पी . भिलाणे यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना बालविवाह निर्मूलन, बालकांचे अधिकार , पालकांची जबाबदारी आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन करतांना उपस्थित पालकांनी उत्साहात कृतीयुक्त सहभाग नोंदविला. याप्रसंगी बालविवाह निर्मूलनासाठी पालकांना नम्र आवाहन करतांना लिंगभाव व पताक्यांचा खेळ यांच्या माध्यमाने जनजागृती केली. बालविवाह निर्मूलनाची व मुलांच्या सक्षमतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , संजयभाऊ ढोले, संदीपभाऊ धनगर यांनी मेहनत घेतली.
