शांतता प्रस्थापित करण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक



शांतता प्रस्थापित करण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक

शिरपूर प्रतिनिधी - देशभरात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्या येथील मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असताना व देशभरात भक्तिमय वातावरण असताना शिरपूर शहराला मात्र काही अज्ञात समाजकंटकांनी गालबोट लावण्याचे काम केले आणि त्याचे पर्यावरण दोन गटातील दंगलीत झाले. या घटनेमुळे शिरपूरच्या शांतता आणि सुव्यवस्थेला काळीमा फसली गेली असून भविष्यात असा कोणताही गैरप्रकार उद्भभवू नये यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तातडीने शांतता कमिटीची बैठक दिनांक 16 जानेवारी रोजी सायंकाळी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती.



 आजवरच्या इतिहासात शिरपूर शहराने नेहमीच संयमाची व एकजूटतेचा संदेश दिला आहे. तीच परंपरा कायम अबाधित ठेवून शहरात शांतता व कायदा सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण व्हावे व कोणासही काही गैरप्रकार आढळून आल्यास तात्काळ शहर पोलिसांना सूचना कराव्या अशी प्रस्तावना मांडून पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांनी बैठकीला सुरुवात केली.

यावेळी उपस्थितनी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत मनातल्या भावना व त्यावरील उपाय योजना याबाबत चर्चा केली. हिंदू धर्मातील लोकांसाठी साठी अत्यंत गर्वाच्या व वर्षानुवर्ष प्रतीक्षेत असलेला उत्सव साजरा केला जात आहे त्यात सर्व धर्मीयांनी सहभाग घेऊन एक एकजूटता दाखवावी असे आवाहन करण्यात आले. शिवाय शहरातील प्रत्येक समाजात काही टवाळखोर, जिहादी मनोवृत्तीचे , व नशाखोरी करून तरुणांची माथी भडकवून उपद्रव्यात करणारे युवक आहेत. त्यांच्या प्रशासनामार्फत आणि प्रत्येक समाजातील जबाबदार नागरिकांकडून बंदोबस्त होणे गरजेचे आहे असा सूर चर्चेतून दिसून आला.

या दरम्यान शहरातील विविध भागात शांतता कमिटीच्या बैठक घेणे, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, रात्री दहा नंतर फिरणाऱ्या टवाळखोरा वर कारवाई करणे, व एकमेकांच्या धार्मिक उत्सवात सहभाग घेणे इत्यादी उपायोजनांसह बैठकीत मंथन करण्यात आले. आणि नरम गरम वातावरणात चर्चा संपन्न होऊन कमिटीची बैठक संपन्न झाली.

यावेळी प्रशासनाकडून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे व उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांनी देखील उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. जर भविष्यात पुन्हा असा प्रकार उद्भवला तर कोणतीही दयावया न करता कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दिला आहे.

सदर बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर, नगरपरिषदेचे सीईओ तुषार नेरकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, संदीप मुरकुटे, कुटे, खैरनार, व पोलीस पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी शिरपूर शहरातील शांतता कमिटीचे सदस्य व सर्व समाज बांधव पत्रकार राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.






Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने