वृक्षमित्र शिवाजी राजपूत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड अवार्ड ने सन्मानित
शिरपूर महेंद्रसिंह राजपूत
शिरपूर तालुक्यातील पर्यावरण दूथ व वृक्षमित्र म्हणून ओळख असणारे शिवाजी राजपूत यांनी पर्यावरण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीचे दखल आजपर्यंत अनेक नामांकित संस्थांनी घेतले आहे. यापूर्वीच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या व विविध सामाजिक संस्था, व जागतिक स्तरावरील संस्था यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
आता त्यांच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक अभिमानास्पद तुरा रोवला गेला असून शिरपूर येथील वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना पर्यावरण व वृक्षलागवड संवर्धन क्षेत्रात आशिया बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त झाला. आशिया खंडात समाविष्ट असलेल्या सर्व देशात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सदरच्या पुरस्कार प्राप्त होत असतो. म्हणजेच शिवाजी राजपूत यांची कीर्ती आता साता समुद्रा पार गेली असून त्यांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील घेतली जात आहे हे पुरस्काराने अधोरेखित होत आहे.
राजपूत यांनी 18 महिन्यापासून दि.०१/०७/२०२२ पासून ते आजच्या तारखेपर्यंत दि. 10 डिसेंबर 2023 पर्यंत 3310 लोकांचे वाढदिवस 545 बांबूचे रोप 923 प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लावून वाढदिवस साजरे करून शुभेच्छा दिल्याआहेत. आलेल्या प्रमुख पाहुण्यांना 2835 रोपे भेट देण्यात आले.असा त्यांनी एक विक्रम केला आहे. ही नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली म्हणून त्यांना आशिया ऑफ बुक अवार्ड मिळाला आहे. या अगोदर त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मिळाला होता.शिवाजी राजपूत हे लोकांच्या आयुष्याबरोबर हजारो वृक्षांना जिवनदान देत आहे हेच वृक्ष हजारो लोकांच आयुष्यमान वाढविणार आहे. शिवाजी राजपूत यांची पर्यावरण क्षेत्रातील अतुलनिय कामाची दखल सर्व स्तरावर घेतली जात आहे. शिवाजी राजपूत यांना मानाचे वनश्री, उद्यानपंडित व इंदिराप्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार मिळाले आहेत. दररोज लोकांचे वाढदिवस समजले कि,त्यांच्या वाढदिवसाला विविध व्यक्तींना बोलवून वृक्षारोपण करत असतात व शुभेच्छा देत असतात. आलेल्या व्यक्तींना रोप भेट देत असतात. असा उपक्रम दररोज अखंडित चालू आहे.
मला मिळालेल्या पुरस्कारांचा मी आदराने स्वीकार करत असून देशभरात व जगभरात माझ्या कार्याची दखल घेतली गेली याबाबत मला अतिशय आनंद असून यापासून मला अधिक काम करण्याची प्रेरणा मिळत आहे अशी प्रतिक्रिया शिवाजी राजपूत यांनी दिली आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सामाजिक राजकीय स्तरावरून व निसर्गप्रेमी नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.
