सरपंचांवर तलवारीने प्राण घातक हल्ला, हल्लेखोरावर कारवाई करा -सरपंच सेवा महासंघाची मागणी




सरपंचांवर तलवारीने प्राण घातक हल्ला,
हल्लेखोरावर कारवाई करा -सरपंच सेवा महासंघाची मागणी


शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावा चे  सरपंच श्री भोजेसिंग राजपूत यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या गावातील रोजगार सेवकावर तात्काळ कठोर कारवाई करून जीवे ठार मारण्याच्या गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून कठोर कारवाई करावी यासाठी शिरपूर तालुका सरपंच सेवा महासंघातर्फे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर  यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.



याबाबत अधिकृत असे की शिरपूर तालुक्यातील जैतपूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री भोजेसिंग राजपूत,शिक्षक व ग्रामस्थ आज मराठी शाळा जैतपूर येथे शौचालय बांधकामासाठी जागा पहायला गेले असता गावातील रोजगार सेवकाने यावेळी हुज्जत घालत कामास विरोध केला व सरपंच श्री भोजेसिंग राजपूत यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले. पोलीस ठाण्याकडून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हि घटना अत्यंत दुर्दैवी असून शांतता प्रिय समजल्या जाणान्या शिरपुर तालुकेला कलंकित करणारी आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सदरचे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी सरपंच सेवा महासंघाकडून तालुक्यातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवेंद्र सिंह सिसोदिया, हेमंत सनेर, राजेंद्र पाटील संग्राम सिंग राजपूत, सचिन जाधव ,महेंद्र सिसोदिया, नारायण सिंह चौधरी ,किशोर माळी ,सोमा भील इत्यादी विविध गावांचे सरपंच यावेळी उपस्थित होते.

यानंतर सदरच्या हल्लेखोरावर कठोर कारवाई करून कायदेशीर कारवाई करून त्याच्या कायमचा बंदोबस्त व्हावा म्हणून सरपंच सेवा संघाने आमदार अमरीश भाई पटेल यांची देखील भेट घेऊन घटनेची माहिती दिली व कारवाईची मागणी केली आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने