75 व्या प्रजासत्ताक दिनी बालविवाह निर्मूलनासाठी गावकरी झाले सज्ज...
दोंडाईचा - श्री .छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय रंजाणे व ग्रामपंचायत रंजाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
भारतीय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण रंजाने गावाचे प्रथम नागरिक तथा सरपंच जितेंद्र ज्ञानेश्वर ईशी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिंदखेडा तालुक्यातील रंजाणे गावाचे राऊळ संस्थान (गढीचे) वंशज तथा दानशूर व्यक्तिमत्व मार्गदर्शक विश्वजीतसिंहदादा राऊळ, उपसरपंचा विद्याताई गणराज बैसाणे, पोलीस पाटील सोनीताई सुनील मोरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस सी पाटील, उपमुख्याध्यापक के एम पाटील, राज्य आदर्श शिक्षक एन पी भिलाणे, माजी सरपंच महेंद्रसिंग राजपूत, विरेंद्र वाडीले ,सुनील मोरे, प्रगतिशील शेतकरी बाबूदादा कोळी, ज्येष्ठ नागरिक विठ्ठलसिंगआण्णा गिरासे,
व्ही बी बोरसे, ए आर चौधरी, आर बी शिरसाठ, श्रीम. एच. पी. पवार, अभिजीत एम बेहेरे, उमेश पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ढिवरे सर,श्री विटकर सर उपस्थित होते.
राज्य आदर्श शिक्षक एन.पी भिलाने यांनी बालविवाह निर्मूलनासाठी पालकांना नम्र आवाहन केले.
लिंगभाव व पताक्यांचा खेळाच्या माध्यमाने जनजागृती करून बालविवाह निर्मूलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले रंजाणे गावाचे सुजाण व सुज्ञ गावकरी यांना मार्गदर्शन केले.
" मुलगा असो वा मुलगी असो,
भेदभावाची साथ नसो,
मुलांमध्ये आत्मविश्वास जागवू,
त्यांच्या आयुष्याचे निर्णय त्यांच्या सोबतच मिळून घेऊ "
या घोषणेने बालविवाह निर्मूलनासाठी रंजाने व परिसरातील नागरिकांना नम्र आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोदभाऊ ढोले , संजयभाऊ देवरे व युवराजभाऊ पवार यांनी मेहनत घेतली.
ग्रामपंचायतचे सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व आजी-माजी पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी वृंद, ग्रामसेवक तलाठी, कोतवाल , अंगणवाडी सेविका विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी तरुण मित्र मैत्रिणी व समस्त सुजाण -सुज्ञ नागरिक उपस्थित होते.
