स्वर्गीय डॉ. डी. बी. पाटील यांची जयंती निमित्त जनसेवेसाठी शवपेटिका दान



स्वर्गीय डॉ. डी. बी. पाटील यांची जयंती निमित्त जनसेवेसाठी शवपेटिका दान 


होळ गावातील लोकप्रिय नेते स्वर्गीय डॉ. डी. बी. पाटील यांची त्यांच्या  होळ गावातील घरी त्यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळेस अनेक वर्ष त्यांनी विविध राजकीय पदांवर असताना गाव व परिसराची सेवा केली होती व गाव परिसराच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन आपल्या कल्पकतेतून विकासाला चालना दिली होती. एक आदर्श समाजसेवक व डॉक्टर म्हणून त्यांची समाजात विशेष अशी ओळख होती. जणू सेवे सोबत त्यांनी एक डॉक्टर म्हणून मोठ्या प्रमाणावर मोफत आरोग्य सेवा देखील या परिसरातील नागरिकांची केली होती. त्यामुळे डॉक्टर डी.बी .पाटील यांच्या रूपाने असलेला एक मोठा आधार हरपल्याने परिसर पोरका झाला आहे. परिसरात एक कुशल राजा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायत ने नेत्र दीपक प्रगती करून विकासाच्या कामांना चालना दिली होती. अनेक पारितोषिके देखील याच कार्यकाळात ग्रामपंचायत ने  प्राप्त केली होती. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याविरुद्ध आठवणींना उजाळा देण्यात आला.

 त्यावेळी ग्रामस्थांनी आणि त्यांच्या मुलांनी त्यांना आदरांजली देऊन त्यांना अभिवादन म्हणुन डॉ. सचिन पाटील आणि डॉ.राहुल पाटील यांनी जन जनसेवेसाठी शवपेटिका दान केली, 
त्यावेळी परिसरातील विकास नाना, ओमेन्द्रसिंग राजपुत,डॉ. पवन दादा, विजु दादा परदेशी,भैया डॉक्टर, पोस्टमास्टर,नांथे सरपंच नेपाल राजपुत,जयपाल राजपुत, सुदामसिंग राजपुत, जितेंद्र रामसिंग राजपुत,तुळशीराम मराठे,पप्पु दादा प्रकाशसिंग सिसोदिया,दयाराम मेहेते,मुन्ना राजपुत, राकेश पाटील,हरपाल साखरलाल राजपुत,रमेश कोळी, प्रमोद राजपुत,लादू नाना, गणु साहेबराव चौधरी,सागर राजपुत,किरणसिंग परदेशी,महेंद्र भाऊसाहेब,हर्षल जैन,भावडू मराठे,पप्पु खाटीक,रवींद्र जतनसिंग राजपुत,नंदुसिंग परदेशी शंकर सिंधी, किशोर मराठे,कैलास मराठे, पत्रकार योगेश पाटील,बाला परदेशी, आणि राजेंद्र दिगंबर परदेशी  टागोर दादा यांच्या परिवारातील सदस्य  उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने