थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर पुण्यात उत्पादन शुल्कची कारवाई, पाच लाखांची दारू जप्त........ प्रतिनिधी दत्ता पारेकर




थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर पुण्यात उत्पादन शुल्कची कारवाई, पाच लाखांची दारू जप्त........

प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे:थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने बिबवेवाडी व कात्रज परिसरात धडक कारवाई करून 5 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
 दोन्ही ठिकाणाहून पथकाने अवैध गोवानिर्मित 
1 हजार 200 बाटल्यांचे 53 बॉक्स, एक दुचाकी वाहन जप्त केले आहे. 
उत्पादन शुल्क विभाग पुणेचे अधिक्षक चरणसिंह रजपूत यांनी ही माहिती दिली. यावेळी निरीक्षक
 अशोक कटकम,
 दुय्यम निरीक्षक
 प्रशांत दळवी, संजय राणे आदी उपस्थित होते.

नववर्षाच्या स्वागतासाठी शहर परिसरात हॉटेल, पबमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. 
या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा वापर होतो.
 यातच अवैधरित्या राज्यात विक्रीसाठी बंदी असलेली गोवानिर्मित दारू छुप्या पद्धतीने अवैधरित्या शहरात आणली जाते.
 यावर कारवाईसाठी पुण्यात उत्पादन शुल्क विभागाने सतरा पथके तैनात केली आहेत.
 यामाध्यमातून शहर परिसर तसेच महामार्गावर गस्त वाढविण्यात आली आहे.  उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्त घालत असतानाच अप्पर बिबवेवाडी भागात एकजण दुचाकीवरून अवैधरित्या दारू वाहतूक करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून संबंधीत व्यक्तीला ताब्यात घेतले.
 त्याच्याकडे 96 सीलबंद दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
 याबाबत त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने त्याच्यासह साथीदारांकडून बिबवेवाडी – कात्रज भागातून विविध कंपनीचे तब्बल 53 बॉक्स जप्त केले.
 तर, तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभाग पुणेचे अधिक्षक चरणसिंह रजपूत, उप अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ मारकड,
 प्रियंका राठोड, 
राहुल खाडगीर, 
राजेश पाटील, 
जवान विशाल गाडेकर, माधव गाडे आदींनी ही कारवाई केली.

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहर पसिरातील पार्ट्यांवर उत्पादन शुल्क विभागाची नजर असणार आहे. अवैधरित्या दारू वाहतूक, विक्री रोखण्यासाठी पथके तयार केली असून रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने