हातचलाखीने महिलेचे पैसे घेऊन आरोपी फरार अन महिला पोलिसात , देहू फाट्यावरील घटना प्रतिनिधी दत्ता पारेकर




हातचलाखीने महिलेचे पैसे घेऊन आरोपी फरार अन महिला पोलिसात , देहू फाट्यावरील घटना

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: एका महिलेकडील चुरगळलेल्या नोटा सरळ करून देतो असे म्हणत हातचलाखी दाखवत 19 हजार रुपये काढून घेण्याचा प्रकार देहूरोड इथे समोर आलेला आहे. देहू फाटा येथील एका बॅंकेत घटना घडलेली असून देहूरोड पोलिसात याप्रकरणी फिर्याद देण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी महिला बँकेत मशीनद्वारे पैसे भरण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळी त्यांच्याकडील काही नोटा चुरगळलेल्या असल्याने मशीन त्या नोटा स्वीकारत नव्हते म्हणून शेजारी असलेला एक अनोखा व्यक्ती याने त्यांना नोटा सरळ करून देतो असे म्हणत 48 हजार रुपयांच्या नोटा घेतल्या मात्र हातचलाखी करत त्यानंतर त्यातील 19 हजार रुपये काढून घेतले . प्रकार लक्षात आल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले आणि महिलेने पोलिसात धाव घेतली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने