भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा प्रकाशा मंडळ अध्यक्ष पदी राजेंद्र भाईदास महाजन यांची नियुक्ती

 



भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा प्रकाशा मंडळ अध्यक्ष पदी राजेंद्र भाईदास महाजन यांची नियुक्ती

नंदुरबार - भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार व भाजपा प्रदेश महामंत्री मा. श्री. विजयभाऊ चौधरी साहेब यांच्या मान्यतेने 
राजेंद्र भाईदास महाजन रा. अनरद ता. शहादा जि.नंदुरबार यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा प्रकाशा मंडळ अध्यक्ष पदी नियुक्ती  जाहीर करण्यात आली आहे.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातील बलशाली भारत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असाल यासह भारतीय जनता पार्टीचे विचार, ध्येय, धोरण सर्व सामान्य लोकांपर्यंत आपण पोचविण्याकरिता व संघटन वाढीसाठी आपण प्रयत्नशील असाल यासाठी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. आपले अभिनंदन सह शुभकामना. असे पत्र भाजपा नंदुरबार जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांनी नियुक्ती करताना दिले आहे.त्यामुळे शहादा तालुक्यातून व नंदुरबार जिल्ह्यातून राजेंद्र माळी यांचे अभिनंदन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने