प्रभू जय श्री विश्वकर्मा आरतीचे पद्मश्री रामजी सुतार यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ संपन्न




प्रभू जय श्री विश्वकर्मा आरतीचे पद्मश्री रामजी सुतार यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ संपन्न

दोडाईचा(अख्तर शाह ) प्रभु जय श्री विश्वकर्मा या आरतीचे नुकतेच युट्युब वर प्रसारीत करुन पाेस्टरचे प्रकाशन करण्यात आले आहे़.मंगेशकुमार हिरे प्रस्तुत, कलाविष्कार निर्मित. प्रभू जय श्री विश्वकर्मा या आरतीची Mp3 ऑडिओ क्लिप चे प्रसारण व पोस्टलचे प्रकाशन निर्माता मंगेशकुमार हिरे यांच्या वाढदिवसा चे अवचित्य साधून. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार, पद्मश्री पुरस्काराचे मानकरी मा राम सुतार यांच्या दिल्ली येथील राम स्टुडिओ मध्ये ऑडिओ चे प्रसारन व पोस्टर प्रकाशन करण्यात आले. या आरती चे गायक विजय नाईक,आशा नाईक, मिक्स मास्टर आतिश बिराडे, आसुन स्वर आशीष स्टुडीओ ध्वनी मुद्रीत करण्यात आले आहे. या प्रसारण प्रसंगी मंगेशकुमार हिरे यांनी सांगितले. विश्वकर्मा समाजाचे अनेक कार्यक्रम संपूर्ण भारतात साजरी होतात. परंतु अनेक ठिकाणी विश्वकर्मा प्रभूंची आरती उपलब्ध होत नसल्याने. मिळेल ते आरतीवर पुढील कार्यक्रम पार पाडावा लागतो. अशा वेळेस प्रभु विश्वकर्मांची आरती आपल्याला सहज youtube च्या माध्यमातून उपलब्ध व्हावी या उद्देशाने हि आरतीचं प्रसारीत  करण्यात आले. यावेळी 'प्रभु जय श्री विश्वकर्मा, ही आरती रामजी सुतार यांनी  त्यांच्या शुभ हस्ते या mp3 व पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. या शुभप्रसंगी माननीय पद्मश्री रामजी सुतार, मा. अनिल सुतार. मंगेशकुमार हिरे, देवयानी हिरे,  उपस्थित होते. दिल्ली नोएडा येथील राम स्टुडिओ मध्ये हा समारंभ संपन्न झाला

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने