विसरवाडी जवळ ट्रक व मोटरसायकल चा भीषण अपघात, दोन ठार एक जखमी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे



विसरवाडी जवळ ट्रक व मोटरसायकल चा भीषण अपघात, दोन ठार एक जखमी

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावानजीक सरपणी नदीच्या पुलाजवळ ट्रक व मोटरसायकलीचा भीषण अपघात दुपारी तीन वाजता सुमारास भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका मोटरसायकलीवर तीन युवक होते.दोन युवकाचा मृत्यू झाला असून एक युवक खंबीर जखमी आहे.



विसरवाडी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मोटरसायकलीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात एकाच मोटरसायकलीवर तीन युवक जात असताना ट्रकने जोरदार धडक दिली यातील एक युवक ट्रकचा मागच्या चाकात अडकल्याने ट्रकने साधारणता आठ ते दहा फूट फरपटत नेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा त्याचा सहकारी ट्रकच्या पुढील चाकात आल्याने गंभीर जखमी झाला आहे तर तिसरा सहकारी देखील अपघातात मयत झाला आहे.अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेण्यासाठी 108 ॲम्बुलन्स नसल्याने खाजगी वाहनांने रुग्णालयात दाखल केले. अपघात होताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली घटनेची माहिती मिळतात तात्काळ विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघात ग्रस्त युवकांना स्थानिकाच्या मदतीने खाजगी वाहनाने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.



या अपघातात नवापूर तालुक्यातील दापूर उची मौली येथील 1) सुनील वसंत गावित या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.2) दुसरा युवकाचा विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मयत झाला आहे. त्याची ओळख पटली नसून तिसरा युवक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने