शिरपूर उपजिल्हा रुग्नालय येथे आमदारांचे हस्ते आयुष्यमान भव: साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे उदगाटन संपन्न
शिरपूर— दि .१३ / ९ / २३ पासून सुरू झालेल्या *आयुष्मान भव :* (आयुष्यमान भारत हेल्थ अँन्ड सेलनेस सेंटर साप्ताहिक आरोग्य मेळावा) कार्यक्रमाचे आयोजन उप जिल्हा रुग्णालय शिरपूर येथे करण्यात आले . कार्यक्रमाचे उद्घाटन शिरपूर आमदार मा.काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या अगोदर शिरपुर परिसरातील ज्या क्षयरोगीसाठी .पोषणहार देऊन विशेष सहकार्य केले आहे अशा निक्षय मित्रांचा आमदार साहेबांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला त्यात निक्षय मित्र''आशाबाई खेमराज पवार,
डॉ मिनाक्षी जोशी, संतोष महारु माळी( शि.व.न.पा.माजी नगरसेवक) टीबी चॅम्पियन*
शेखर पाटील,सुभाष पाटील,भगवान बोरसे डॉट प्रोव्हाडर,वैशाली रणछोड बुवा,सविता चंद्रशेखर धर्माधिकारी , यांचे विशेष सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमास आमदार काशिराम पावरा यांनी आपल्या मनोगतात क्षयरोगाविषयी न घाबरता प्रत्येक रुग्नाने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे या कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय प्रमुख वैद्यकीय अधिक्षक मा. डॉ.अमोल जैन, माजी वैद्यकीय अधिक्षक मा.डॉ वाघ, माजी नगरसेवक संतोष माळी,वैद्यकीय अधिकारी—मा.डॉ अहिरे, मा.डॉ आगळे धनराज पवार,(STS) छत्रसिंग राजपूत इत्यादी उपस्थित होते तसेच शिरपुर परिसरात (क्षयरोग दत्तक घेणे) म्हणजे क्षयरोगीस दरमहा
.पोषणहार देण्याकरीता सर्व जनसमुदायास आव्हान करण्यात येत आहे ज्यांची मनापासुन इच्छा असेल अशा महानुभवांनी संपर्क साधावा तसेच आशाबाई पवार पुढे आणखी क्षयरोग दत्तक घेण्यास उत्सुक आहेत या अगोदर बरेच पेंशट क्षयरोगा पासुन मुक्त झाले आहेत या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाँ.साळुंखे यांनी केले व डाँ.देवरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमात क्षयरोगा विषयी जास्तीत जास्त जनजागुर्ती करण्यात आली व या साप्ताहिक आरोग्य मेळाव्यात आपआपल्या परिसरात क्षयरोगा विषयी जनजागुर्ती करावी असे आव्हाण करण्यात आले
