*थाळनेर येथील तेले वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त "शिक्षक दिन" साजरा
थाळनेर
एम.जी. तेले सी. आणि बी.आर. तेले सायन्स, के. तेले मॅनेजमेंट कॉलेज थाळनेर ता. शिरपूर जि. धूळे येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.. त्या अनुषंगाने महाविद्यालयात प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. बी.बी. मंगळे सरांच्या हस्ते करण्यात आले.. तसेच कार्यक्रमाला उपस्थित रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. जे.जी. पावरा, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एच.डी. सोलंकी, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डी.टी. गिरासे, प्रा. आर.जी. तरोळे, प्रा. व्ही.एस. भोये, कार्यालयीन अधीक्षक श्री. एन.वाय. काझी व विद्यार्थी देखील उपस्थित होते..
