शिरपूर येथे आमदार कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनपट, चित्र प्रदर्शनीचे आदिवासी विकासमंत्री ना. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन

शिरपूर : शिरपूर येथे आमदार कार्यालयात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनपट, चित्र प्रदर्शनीचे आदिवासी विकासमंत्री ना. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
आदिवासी विकासमंत्री ना. विजयकुमार गावित म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रात विकास केला असून भारत देशाला जगात मोठे स्थान प्राप्त करून दिले आहे. विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामे करून गतिमान भारत देश म्हणून नावारूपाला आणले आहे. शिरपूर आमदार कार्यालयात प्रदर्शित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्र प्रदर्शनीतून विविध पैलूंचा उलगडा होत असल्याने नरेंद्र मोदीजी यांच्या बद्दल अभिमान वाटतो.
शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम दादा पावरा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगात भारताचे नाव उज्वल केले असून जगात प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून ते पुढे आले आहेत. संपूर्ण देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य अफाट आहे.
शिरपूर विधानसभा प्रभारी प्रभाकरराव चव्हाण यांनी प्रास्ताविकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनपट विषयी सविस्तर माहिती देऊन वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार कार्यालयात उभारण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनीला नागरिक व कार्यकर्ते यांनी भेट द्यावी असे आवाहन केले.