आर सी पटेल व्यायाम शाळेच्या पैलवान विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

आर सी पटेल व्यायाम  शाळेच्या पैलवान विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड



  शिरपूर - धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालीम संघ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शालेय शासकीय कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२३  दिनांक १६ व १७ सप्टेंबर २०२३ वार :- शनिवार व रविवारी जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत  आर सी पटेल व्यायाम  शाळेच्या पैलवान विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड. झाली असून निशांत युवराज महाजन ५२ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकन जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाने विजय प्राप्त करून शिरपूर तालुक्याचे नावलौकिक वाढवले आहे.

 14 वर्षे वयोगटातील मुले

१) यज्ञेश भरत कदम ३५ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक
२) प्रतीक हरिदास माळी ३८ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक
३) दिपेंद्र जयपाल देशमुख ४१किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक
४) निशांत युवराज महाजन ५२ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक

 १७ वर्षे वयोगटातील मुले

१) पै.प्रणव दौलत सोनवणे ४५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक
२) कार्तिक सतीश कुवर ९२ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक
 
 १७ वर्षे वयोगटातील (मुली)

१) योगिता माळी ५३ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक

 19 वर्षे वयोगटातील मुले

१) मनीष खंडू महिरे ६१ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक

 १९ वर्षे वयोगटातील (मुली)

१) प्रतीक्षा चौधरी ५० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक

या मुल्लांनी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांची शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यांना आरसी पटेल प्रशिक्षक कन्हैयालाल (पप्पू )माळी सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने