वनगळीत कलश रोहन सोहळा उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा. इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व नीरा - भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांची आर्वजुन उपस्थित प्रतिनिधी दत्ता पारेकर

वनगळीत कलश रोहन सोहळा उत्साहात  व भक्तीमय वातावरणात साजरा.

इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व नीरा - भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांची आर्वजुन उपस्थित 

प्रतिनिधी दत्ता पारेकर 


पुणे :इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील श्री सिद्धनाथ देवस्थान चा कलशरोहन समारंभ मोठ्या भक्ती भावाने  उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याची सुरुवात सकाळी सहा वाजता होमवनाने करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता कलशाचे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. कलश्याच्या मिरवणुकीनंतर बालयोगी हभप बाबाजी महाराज चाळक यांच्या हस्ते कलश रोहन करण्यात आले . त्यानंतर चाळक महाराज यांचे कीर्तन झाले या कीर्तन साठी वनगळी , गलांडवाडी नंबर एक, राजवडी गागरगाव, बिजवडी, करेवाडी बनकरवाडी, अवसरी ,कालठणनंबर एक येथील भजनी मंडळाने कीर्तन साथ केली .तसेच मृदंग वादक पुरी महाराज यांनी आपल्या मृदंग वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.  कीर्तनानंतर महाआरती संपन्न झाली.

महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याचे संचालक हिरालाल शंकर पारेकर ,उद्योजक पोपटराव बापूराव पारेकर ,बिजवडी ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच दिलीप माणिक भिसे, पत्रकार दत्ता नागनाथ पारेकर, किसन बळीराम पारेकर, दशरथ महादेव पारेकर. यांच्या वतीने करण्यात आले होते. 
या कार्यक्रमासाठी यश उद्योग समूहाचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी कलशरुणासाठी क्रेन देऊन सहकार्य केले .तर जाकीर मंडप आणि साऊंड सिस्टिम यांनी उत्कृष्ट  मंडप सजावट व मंदिर शिखरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई केले होती.  पांडुरंग पुरंदरे काका यांनी कलशावरती मंत्रोउपचार केले.  हा  कार्यक्रमा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समस्त ग्रामस्थांचे , व देणगीदारांचे व हपभ संतोष महाराज कांबळे यांचे सहकार्य लाभले. ‌ 

या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनच्या विनंतीस मान देऊन इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय  भरणे , निरा -भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील, प्रताप पाटील, अमोल भिसे, दीपक जाधव, छगनराव भोंगळे ,औदुंबर कचरे, देविदास वीर ,कुंडलिक कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष नरूटे यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने