शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्याचे ईश्वरीय कार्य मनापासून करावे – माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांचे आवाहन, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ

 


 

शिरपूर : आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.सी.आर.पाटील यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व एस.डी.पाटील यांना राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार मिळाल्याने संस्थेसाठी हा फार मोठा बहुमान आहे. त्यांच्या सारखे सर्व शिक्षक, विद्यार्थी तयार कराविद्यार्थ्यांना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे ही माझ्या मनातील भावना आहे. मुंबईच्या एस.व्ही.के.एम. संस्थेसह शिरपूरच्या आर.सी.पटेल संकुलामार्फत आपण हजारो विद्यार्थ्यांना घडवत आहोत. शिरपूर शहर व तालुक्याला सर्वोत्तम तालुका करण्याचे प्रयत्न सुरु असून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सर्वच क्षेत्रात विकास केला जात आहे. सर्वांच्या आरोग्य सेवेसाठी एस.व्ही.के.एम. संस्थेमार्फत 85बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटलचे निर्माण कार्य सुरु आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार ‍शिक्षणाची सोय निर्माण करुन शिरपूर एज्युकेशन हब केले आहे. लवकरच विविध मेडिकल कॉलेजेस उभारले जाणार आहेत. भूपेशभाई पटेल देखील तालुक्याची मनापासून सेवा करतात. सौ. जयश्रीबेन पटेल, सौ. कृतिबेन पटेल, चिंतनभाई पटेल, मेहा पटेल, कु. द्वेता पटेल यांच्यासह संपूर्ण पटेल परिवाराने सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे. आपणही सर्वांनी एकजुटीने काम रुन योगदान द्यावे. प्रत्येकाच्या मना पारिवारिक भावना तयार करा. एकमेकांना सहकार्य करा. ट्रेनिंग सेंटर सुरु करुन सर्व प्राध्यापक व शिक्षकांना नियमितपणे प्रशिक्षण द्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्याचे ईश्वरीय कार्य मनापासून करावे. गरीब व गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात सक्षम करण्यासाठी सर्व प्रकारच्या मोफत सोयीसुविधा देवून आपण संस्थेमार्फत “शिरपूर 60” अभिनव उपक्रम राबवित आहोत. तालुक्याच्या प्रगतीसाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.

आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.सी.आर.पाटील यांना दिल्ली येथे विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व खंबाळे येथील आर. सी. पटेल मराठी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक एस.डी.पाटील यांना मुंबई येथे शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मधील “राजगोपाल भंडारी हॉल” मध्ये गुरुवारी 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारीसचिव प्रभाकरराव चव्हाणकमलकिशोर भंडारीगोपाल भंडारीशिरपूर पिपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉसंजय सुराणा, खंबाळे शाळेचे प्राचार्य आर.एन.पवार, पुरस्कारार्थी प्रा.डॉसी. आर. पाटील, पुरस्कारार्थी एस. डी. पाटील, त्यांचे कुटुंबिय विराजमान होते.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉसंजय सुराणा म्हणाले, आ. अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरु असून राष्ट्रीय, राज्य स्तरावर महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने यश संपादन करत आहेत. उमवि मधील निकालात असंख्य सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाचे असतात ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. आतापर्यंत महाविद्यालयाला 10 कोटी रुपयांचे रिसर्च अनुदान मिळाले असून विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी सातत्याने अनेक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पगारावर निवड होते. जीपॅट-2023 परीक्षेत या वर्षी 117 विद्यार्थी उत्तीर्ण होवून महेंद्र महाजन या विद्यार्थ्याने देशात प्रथम क्रमांक प्राप्त करून इतिहास रचला आहे. महाविद्यालयाला केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे एनआयआरएफ. मानांकन मिळाले आहे. संपूर्ण भारतातील फार्मसी विद्याशाखेतून मागील आठ वर्षांपासून एनआयआरएफ रँकिंगमध्ये महाविद्यालयाने सतत प्रथम 50 उत्कृष्ट महाविद्यालयात स्थान प्राप्त केले आहे. महाविद्यालयाला “नॅक” चे दुसऱ्यांदा मानांकन प्राप्त झाले असून एन.बी.ए. संस्थेचे थर्ड सायकल (तिसऱ्यांदामानांकन मिळाले असून सहा वर्षा साठी प्राप्त झाले आहे असेही डॉ. संजय सुराणा म्हणाले.

कार्यक्रमाला संस्थेचे अकॅडमिक इन्चार्ज पी.व्ही.पाटील, प्राचार्य डॉ. जे. बी. पाटीलप्राचार्य डॉ. नितीन हासवानी यांच्यासह संस्थेतील सर्व शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी सत्कारार्थी प्रा.डॉ.सी.आर.पाटील मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, आ. अमरिशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीमुळे व मार्गदर्शनामुळे मला चांगले काम करण्याची संधी मिळाली. मी खूप ठिकाणी नोकरी केली, पण 19 वर्षापासून शिरपूरच्या या संस्थेतील महाविद्यालयात नोकरी करतोय म्हणून मला पुरस्कार मिळाला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण, महाविद्यालयात खूपच सोयीसुविधा उपलब्ध असल्याने मला उत्कृष्ट काम करता आले, जेणेकरुन माझी राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेतशिक्षकाला उत्कृष्ट काम करण्याची संधी येथे मिळते. दिल्ली येथे अनेक पुरस्कारार्थी मध्ये राष्ट्रपती यांच्या हस्ते आपल्याला बहुमान मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आम्हाला 80 मिनिटे वेळ देवून प्रेरित केले. राष्ट्र निर्मिती कार्यात सर्व शिक्षकानी झोकून द्यावे असे आवाहन मोदीजी यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा, लिखाण काम कमी व्हावे असेही ते म्हणाले.

सत्कारार्थी शिक्षक एस. डी. पाटील म्हणाले, आ. अमरिशभाई पटेल व सर्वांच्या मार्गदर्शनामुळे पुरस्कार मिळाला. मला शासनाकडून मिळालेल्या लाख 11 हजार रुपये बक्षीस कमेतून 11 हजार रुपये खंबाळे शाळेतील विद्याथ्यांसाठी भेट देत आहे. यापुढे आयुष्यात विद्यार्थी व समोज सेवेसाठी वाहून घेईल असेही ते म्हणाले.

संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते फार्मसी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.सी.आर.पाटील यांना संस्थेतर्फे 1 लाख रुपयांचा धनादेश व ‍तिन वेतनवाढ तसेच खंबाळे येथील विद्यालयाचे शिक्षक एस.डी.पाटील यांना 25 हजार रुपयांचा धनादेश देवून गौरविण्यात आले.

सूत्रसंचालन प्रा. स्नेहल भावसार यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने