राज्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा - मंत्री छगन भुजबळ* *गोदामांच्या दुरुस्तीकरीता डिपीसीतुन निधी मिळण्याासाठी प्रस्ताव सादर करावा* *अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ* नाशिक शांताराम दुनबळे

*राज्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा - मंत्री छगन भुजबळ*

*गोदामांच्या दुरुस्तीकरीता डिपीसीतुन निधी मिळण्याासाठी प्रस्ताव सादर करावा* 
   *अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ* 

नाशिक शांताराम दुनबळे



नाशिक-:राज्यभरातील दिव्यांग नागरिकांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे आदेश आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. अंत्योदय योजनेचा जर इष्टांक संपला तर प्राधान्य कुटुंब योजनेतून दिव्यांग बांधवांना अन्न धान्य देण्यात यावेत मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्न धान्यापासून दिव्यांग वंचित राहणार नाही असे नियोजन करण्याचे निर्देश देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री.भुजबळ यांनी संबंधितांना निर्दैशित केले.


अन्न नागरी पुरवठा विभागाच्या गोदामांची  दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून आवश्यकतेनुसार अर्थ सहाय्य मिळण्यासाठी विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिल्या.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, जनतेला रास्त भाव दुकानांमधुन वेळेवर शिधा उपलब्ध करुन देण्याची दक्षता विभागाने घ्यावी तसेच या धान्यांचा साठा करण्यासाठी गोदामांना सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे,तरी  विभागाच्या सर्व गोदामांची दुरुस्ती प्राधान्याने करुन घ्यावी.त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी तसा प्रस्ताव तातडीने सादर करावा. शिवभोजन केंद्राच्या माध्मयातून गरजूंना सहाय्य होत असून सर्व शिवभोजन केंद्र सुरळीतरित्या सुरु असण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. तसेच जे  शिवभोजन केंद्र मुदतीत सुरु झालेले नाही, याबाबत कालमर्यादेत माहिती मागवून अद्याप सुरु झालेले नाहीत अशी केंद्रे रदद्  करावीत. शिवभोजन केंद्रांची देय असलेली देयके वेळेत द्यावीत. राज्यातील जनतेला अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून अधिक तत्परतेने गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने विभागाचे संगणकीकरण करून अधिक पारदर्शकता आणावी अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. 
तसेच वैधमापन विभागाचा आढावा घेऊन सर्व ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ,पूरक साधनसामुग्री,वाहन व्यवस्था ठेवण्याचे सूचीत केले. वाहन काट्यांप्रमाणे (वे ब्रीज) प्रमाणे पेट्रोल पंप तपासणीसाठी सुध्दा SOP प्रमाणित संचालन कार्यप्रणाली बनवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
बैठकीस सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने