माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील 471 लाभार्थ्यांचे विविध शासकीय योजनांचे प्रस्ताव मंजूर

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील 471 लाभार्थ्यांचे विविध शासकीय योजनांचे प्रस्ताव मंजूर



शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील 471 लाभार्थ्यांचे विविध शासकीय योजनांचे प्रस्ताव मंजूर झाले असून सर्व लाभार्थी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.


माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार कार्यालयात "विकास योजना आपल्या दारी अभियान" गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असून तालुक्यातील जनतेला असंख्य शासकीय योजनांचा मोफत लाभ मिळवून दिला जात आहे.


संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या तिन्ही योजनांचे 460 लाभार्थी प्रस्ताव तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे 11 असे एकूण 471 योजनांच्या प्रस्तावांना तहसीलदार महेंद्र माळी यांनी मंजुरी दिली असून आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसाची 471 लाभार्थ्यांना भेट मिळाली असल्याचे शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील यांनी सांगितले.


महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या असंख्य योजनांचा लाभ मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आमदार कार्यालयात व्यापक स्वरूपात काम सुरू

असून आतापर्यंत हजारो लाभार्थ्यांनी योजनांचा आमदार कार्यालयामार्फत प्रत्यक्ष लाभ घेतला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने