आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त सावळदे येथील एस.व्ही.के.एम. कॅम्पस मध्ये 304 दात्यांनी केले रक्तदान

आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त सावळदे येथील एस.व्ही.के.एम. कॅम्पस मध्ये 304 दात्यांनी केले रक्तदान



 

शिरपर : एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सावळदे येथील एस.व्ही.के.एम. कॅम्पस, मुकेश पटेल टेक्नॉलॉजी पार्क मध्ये 304 दात्यांनी रक्तदान केले असून दोन दिवसात शिरपूर व धुळे येथील विविध महाविद्यालयांमध्ये 1309 दात्यांनी रक्तदान केल्याने गरजू रुग्णांसाठी खूप मोठी सोय झाली आहे.




यावर्षी कु. द्वेता दीदी भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट च्या सौजन्याने जळगाव येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी ब्लड बँकेच्या सहकार्याने माजी  शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त संकलनाचे कार्य पार पडले.

सावळदे येथील एस.व्ही.के.एम. कॅम्पस, मुकेश पटेल टेक्नॉलॉजी पार्क मध्ये 14 सप्टेंबर 2023 रोजी आमदार काशिराम पावरा, एस.व्ही.के.एम. संस्थेचे ट्रस्टी राजगोपाल भंडारीशिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, सावळदे कॅम्पसचे ची अकौंटंट अँड डमिनिस्ट्रेटर राहुल दंदेशामकांत ईशी, इंडियन रेड्क्रोस सोसायटी चेअरमन विनोद बियानीआपत्ती व्यवस्थापन चेअरमन सुभाष साखलाजन संपर्क अधिकारी श्रीमती उज्वला वर्माडॉ. अरविंद चौधरीडॉ. अनिल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी उत्साहाने सामाजिक उपक्रम तसेच रक्तदान शिबीर आयोजित केले जाते.

सावळदे कॅम्पसचे प्रभारी डायरेक्टर डॉ. आर. एस. गौडची अकौंटंट अँड डमिनिस्ट्रेटर राहुल दंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीनअसोसिएट डीन्स, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.

तसेच प्रा. डॉ. पायल दंदे यांच्या मार्गदर्शनाखाली "इच वन सेव वन" च्या स्वयंसेवकांचे रक्तदान शिबिरासाठी दिवसभर अनमोल सहकार्य लाभले.

13 सप्टेंबर 2023 रोजी आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूर येथे 363 दात्यांनी व धुळे येथील एस. व्ही. के. एम. कॅम्पस मध्ये 282 दात्यांनी रक्तदान केले. तर 14 सप्टेंबर 2023 रोजी सावळदे येथील एस. व्ही. के. एम. कॅम्पस मध्ये 304 दात्यांनी, आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजमध्ये 150, आर. सी. पटेल सीनियर कॉलेज 102, आर. सी. पटेल आय. एम. आर. डी. कॉलेजमध्ये 108 असे एकूण 1309 दात्यांनी रक्तदान केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने