ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत नागरिकांचे आंदोलनासाठी मी पुन्हा येईन चा इशारा मालकातर, भोईटी ग्रामस्थांनी दिली पुन्हा आंदोलनाची हाक

 


ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत नागरिकांचे आंदोलनासाठी मी पुन्हा येईन चा इशारा


मालकातर, भोईटी ग्रामस्थांनी दिली पुन्हा आंदोलनाची हाक


शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत चाकडू मालकातर व भोइटी या ग्रामपंचायतीमधील विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत पंचायत समिती शिरपूरच्या कार्यालयाबाहेर दिनांक 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत आमरण उपोषण आंदोलन केले होते. यावेळी प्रशासनाने चौकशीसाठी वेळ मागत आंदोलन स्थगित केले होते. मात्र सदरच्या चौकशी समितीने तयार केलेला अहवाल हा तात्पुरता व थातूरमातूर असून त्यात दिलेली माहिती स्पष्ट दिसत आहे की या ग्रामपंचायतीच्या कारभारात भ्रष्टाचार असून देखील संबंधित चौकशी समितीने सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सदर चौकशी अधिकाऱ्यांची देखील ग्रामपंचायतची संगणमत असल्याचे निदर्शनास येते असा आरोप केला आहे.


त्यामुळे या बाबतीत उपोषण करताना सदरच्या चौकशी समितीच्या अहवाल मान्य नसून मागणी करण्यात आलेल्या ग्रामपंचायत मालकातर व  भोईटी अंतर्गत झालेल्या संपूर्ण विकास कामे व आलेल्या निधीच्या वापराच्या चौकशी करून दोशींवर गुन्हे दाखल करावेत तसेच पाच टक्के अभंग निधी पैसा अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी पुन्हा एकदा गटविकास अधिकारी शिरपूर यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनाची प्रत सर्व प्रशासकीय अधिकारी व मंत्रालय स्तरावरील संबंधित मंत्रालय यांना पाठवण्यात आले आहे.


वरील निवेदनात नमूद केले आहे की जर संबंधितांवर चौकशी करून कारवाई केली नाही तर उपोषण करते नितीन नरेंद्र पावरा व नरेंद्र जाड्या पावरा, भोंग्या हेदर्या पावरा हे दिनांक 5 सप्टेंबर पासून पुन्हा पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यामुळे पुन्हा उपोषण होऊन उपोषण करता यांना काही झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी गटविकास अधिकारी शिरपूर यांची राहील असे नमूद केले आहे. शिवाय याबाबत आता न्याय न मिळाल्यास आंदोलन करते यांनी उच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याच्या देखील इशारा दिला आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने