दिव्यांगांसाठी विविध योजना व साहित्याच्या लाभ नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

 दिव्यांगांसाठी विविध योजना व साहित्याच्या लाभ

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे



कोंढावल : दिव्यांग व्यक्ती हा स्वाभिमानाने जगला पाहिजे शासनाने त्यांच्यासाठी शासनाकडून अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आमचे कर्तव्य आहे समाजातील दुर्बल व दुर्लक्ष दिव्यांगांना जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या  मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्याचे शिक्षण प्रशिक्षण संदर्भात असलेल्या शिष्यवृत्ती योजना दिव्यांग कर्ज योजना मोफत कृत्रिम साहित्य साधने दिव्यांग राज्य शासन पुरस्कृत योजना अशा विविध योजना तळागाळापर्यंत योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवणार असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी केले


शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील राम मंदिर सभागृहात दिव्यांग बांधवांना अंत्योदय शिधापत्रिका तसेच शालेय विद्यार्थ्यांना दप्तर तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाच्या आयोजन महात्मा ज्योतिबा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती  हेमलता शितोळे करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित होते याप्रसंगी प्रांताधिकारी सुभाष दळवी शहादा तहसीलदार दीपक गिरासे धडगाव तहसीलदार कल्पेश जाधव समता परिषदेचे विनोद अहिरे नायब तहसीलदार विजय साळवे  मंडल अधिकारी गजानन पवार कोंढावळचे सरपंच गोपाल भील  उपसरपंच हिराबाई माळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिपक माळी पंचायत समितीचे माजी सदस्य विजय पाटील माजी सरपंच फुलसिंग भील सेवानिवृत्त पोलीस पाटील सुरेश गोसावी माजी सरपंच दिलीप भील लक्ष्मण भिल बामखेडा सरपंच मनोज चौधरी उपसरपंच अभय गोसावी सामाजिक कार्यकर्ते बापू मराठे खेडदिगर चे समाजिक कार्यकर्ता देवीदास माली खापरखेड़ा सरपंच सरकार भील  ग्रामसेवक गोविंद गिरासे आदीसह परिसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य  दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते

यावेळी ना डॉ गावित पुढे म्हणाले कामगार विभागात परिसरातील मजुर बांधवांनी नोंदणी करून घ्यावी नोंदणी केलेल्या कामगार विभागाच्या विविध योजनांसह त्या लाभार्थ्याला दोन लाखापर्यंत घरकुल योजना असून त्याचा लाभ घ्यावा तसेच २०२४ पर्यंत प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळतील असे आश्वासित केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार माळी यांनी केले सूत्रसंचालन कैलास शेंगदाणे यांनी केले कार्यक्रमाचे आभार  महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठान महा राज्य चे संस्थापक  यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उद्योजक शशिकांत पाटील  ग्रा प सदस्य निम्बा माली अर्जुन शेवाले भिकूबाई भील आशाबाई भील रूबदास भील ब्रिजलाल भील जि प शालाचे मुख्याध्यापक मनोहर पाटील पत्रकार जगदीश माली तुषार माली सर नारायण अहिरे भानुदास माली नरेन्द्र सैंदाने रविंद्र माली कैलास सैंदाने नाना मिस्तरी रूबदास भील महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठान चे शाहदा तालुका अध्यक्ष संजय मिस्तरी गणेश निंबा वाल्हे  आदि गावातील तरुण मित्र तसेच महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठान चे  कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने