आई -वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटपाचा स्तुत्य व अभिनव उपक्रम




आई -वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटपाचा स्तुत्य व अभिनव उपक्रम


शिरपूर : स्व. तपनभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने येथील आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आई किंवा वडील नसलेले तसेच आर्थिक परिस्थितीने कमकुवत असे पाचवी ते दहावीतील एकूण १११ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप कार्यक्रम विद्यालयामार्फत राबविण्यात आला.


या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटी ट्रस्टी सौ. कृतीबेन भूपेशभाई पटेल, मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या डायरेक्टर कु. द्वेता भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी वसंत पावरा, गोपाल भंडारी, विजय अग्रवाल, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते गोपाल चौधरी, जाकीर शेख, संस्थेचे अकॅडमिक इन्चार्ज पी. व्ही. पाटील, प्राचार्या श्रीमती शारदा शितोळे, सौ. पौर्णिमा पाठक, प्राचार्य पी. आर. साळुंखे, मुख्याध्यापक सी. डी. पाटील, मुख्याध्यापक मनोज पाटील, पर्यवेक्षक एन. ई. चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.


आई किंवा वडील नसलेल्या ५ वी ते १० वी तील ८६ विद्यार्थी तर आर्थिक परिस्थितीने गरीब असलेले २५ असे एकूण १११ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.आर.जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पी. आर. साळुंखे व पर्यवेक्षक एन. ई. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एन. अहिरे, शाम पाटील, एस. एस. चौधरी, बी. बी. अग्रवाल, सुनिल पाटील, एस. डी. गाडीलोहार, वाय.व्ही.कोठावदे, सुजित जाधव, व्ही. जी. सोनवणे, एम. एस. पाटील, श्रीमती ए. बी. वाल्हे, एस. आर. सपकाळे, एन. के. देवरे, बी. जे. गायकवाड, पी. डी. राजपूत, जे.डी. चौधरी, मुकेश परदेशी, शाळेतील  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने