*स्वातंत्र्यदिनी दुगलगाव शाळेत पार पडला विविध उद्घाटन समारंभाचा त्रिवेणी संगम...*
*सेंद्रिय परसबाग, अद्ययावत संगणक कक्ष ,वृक्षदेणगीदार नामफलकाचा अनावरण समारंभ उत्साहात संपन्न*
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:दुगलगाव ता.येवला.जि नाशिक येथील जि.प.प्राथमिक शाळेत लोकसहभागातून साकारलेली सेंद्रिय परसबाग तसेच अद्ययावत संगणक कक्ष व टर्मेलिया या दर्जेदार वृक्ष देणगीदारांच्या नाम फलकांचा अनावरण उद्घाटन समारंभ दुगलगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ.आशाताई रावसाहेब लासुरे यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच शाळेचे ध्वजारोहण दुगलगावचे माजी सैनिक गोविंद पंचमेढ़े यांच्या हस्ते करण्यात आले.
दुगलगाव शाळेत शिक्षकांच्या व पालकांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून उत्तम दर्जाची सेंद्रिय परसबाग तयार करण्यात आली असून त्यामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला , उपयोगी औषधी वनस्पती व विविध प्रकारच्या फुलझाडांचा देखील समावेश या परसबागेमध्ये केलेला आहे तसेच गेल्या वर्षी ग्रामपंचायत दुगलगाव मार्फत शाळेला पाण्याची टाकी बांधून दिलेली असल्याने त्या टाकीमधून ठिबक सिंचनद्वारे पाण्याची व्यवस्था सदर परसबागेसाठी कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे .
तसेच मागील वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची वेळी जमा झालेल्या बक्षीसांच्या रकमेतून शाळेसाठी एक संगणक ,एक प्रिंटर खरेदी करुन अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन या निमित्ताने करण्यात आले व शाळेला अद्यावत वॉल कंपाऊंड असल्याने शाळेमध्ये टर्मेलिया सारख्या नवीन दर्जेदार वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले असून त्या वृक्षदेणगीदारांच्या नामफलकांच्या अनावरण या निमित्ताने सर्व वृक्षदेणगीदार , पालक,ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तसेच या दिवशी गावातील शिक्षण प्रेमी नागरिक युवा नेते श्रीराहुल लासुरे व श्री सुदाम पंचमेढे यांच्या हस्ते सर्व शालेय विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतिल उपशिक्षक श्री योगेश माकोणे सर यांनी सूंदर साहित्यिक भाषेत केले व शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल धुमाळ सर यांनी स्वातंत्र्यदिन व विविध उद्घाटन कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहिल्या बद्द्ल सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.
याप्रसंगी दुगलगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रकाश मोरे ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र त्रिभुवन , सौ.सविता राहुल लासुरे, सौ.माधुरी योगेश लासुरे , पोलीस पाटील भगवान पा. सावळे ,मा.सरपंच रावसाहेब पा. लासुरे, मा. सरपंच सकाहारी लासुरे, श्री.रामदास लासुरे, श्री.गोरख लासुरे , श्री.निवृत्ती लासुरे , श्री.भाऊसाहेब लासुरे,श्री.तुळशीराम मोरे , श्री.दत्तात्रय निकम श्री.प्रवीण डुबे , श्री.अमोल सोमासे, श्री.अंकुश लासुरे, श्री.ज्ञानेश्वर साबळे , श्री.किरण लासुरे , श्री.संतोष मोरे, श्री.संतोष लासुरे , श्री.बळीराम मोरे , श्री.जीवन लासुरे, श्री अजय लासुरे, श्री सुभाष लासुरे, श्री प्रशांत लासुरे , श्री.सारंगधर भागवत , इत्यादी ग्रामस्थ भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित होते
_दुगलगाव शाळेतिल श्री.राहुल धुमाळ सर व श्री.योगेश माकोणे सर हे दोन्हीही शिक्षक उपक्रमशील असून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राब वत असतात. सेंद्रिय परसबाग, वृक्षनामफलक सारख्या उपक्रमामुळे शाळेच्या लौकिकामध्ये निश्चितच भर पडली असून भविष्यात सुध्हा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळेला सर्वोतपरि सहकार्य करण्यास नक्कीच कटीबद्ध राहू...._
*श्री सोनंद मधुकर गांगुर्डे*
*अध्यक्ष*
*शाळा व्यव्स्थापन् समिती दुगलगाव*
