मिरची पावडर वापरुन महामार्गावर जबरी चोरी करणारी टोळी मुददेमालासह जेरबंद

 



मिरची पावडर वापरुन महामार्गावर जबरी चोरी करणारी टोळी मुददेमालासह जेरबंद



धुळे जिल्हयात मागील काही दिवसापासून महामार्गावर प्रवास करणा-या इसमांना त्यांचे डोळयात मिरचीची पावडर फेकुन गावठी बनावटीचे पिस्तुलचा वापर करुन धमकी देवुन जबरदस्तीने त्यांचेकडुन रोख रक्कम, मोबाईल व मोटार सायकल हिसकावून पळुन जाणे असे गुन्हे घडत होते .त्याबाबत मा पोलीस अधिक्षक श्री संजय बारकुंड सो यांनी सदर प्रकारचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना निर्गमीत केलेल्या होत्या.


दिनांक १५/०८/२०२३ रोजीचे २३.३० ते दिनांक १६/०८/२०२३ रोजीचे सकाळी ०६.०० वा पर्यंत आझाद नगर पोलीस ठाणे हद्यीत गिंदोडीया चौक येथे नाकाबंदी व कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आलेले होते. नाकाबंदी व कोम्बींग दरम्यान पोनि श्री नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, तिन इसम हे एका पांढ-या रंगाच्या एक्टीवा मोसा क्र एम एच १८ बी पी ६३०८ हिवर बसुन पारोळा चौफुलीकडुन गिंदोडीया चौकाकडे येणार असुन त्यांचे कब्जात गावठी बनावटीचे पिस्तुल आहे. नमुद प्रमाणे बातमी मिळालेनंतर पोनि देशमुख यांनी आझादनगर पोलीस ठाणेकडील सपोनि पाटील व शोथ पथकातील कर्मचारी यांना नमुद बातमीची खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशीत केलेवरुन सपोनि पाटील व पथकाने गिंदोडीया चौक येथे दुचाकी वरील १) शेखर दत्तु वाघमोडे, वय २३ वर्षे रा भोकर, ता जि. धुळे २) चेतन जिभाऊ पाटील, वय ३० वर्षे रा भोकर, ता जि धुळे ३) विकास संजय केदारे, वय २५ वर्षे रा पश्चिम हुडको, साईबाबा मंदीराजवळ, चाळीसगाव रोड, धुळे अशा तिन इसमांना ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्तोल तसेच एक जिवंत काडतुस मिळुन आले म्हणुन सदर इसमांना ताब्यात घेवुन आझादनगर पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचे विरुदध आझादनगर पोलीस ठाणे येथे भाग ६ गुन्हा रजि नं २१८ / २०२३ भादंवि कलम ३४ सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, २७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणेगुन्हा दाखल केलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास मा पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख हे करीत आहेत. नमुद गुन्हयाचे तपासात असताना आरोपीत यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे सखोल विचारपुस केली असता


त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे, १) दिनांक ०९/०८/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास नगावबारीच्या पुढे पोददार इन्टरनॅशनल शाळेजवळील मुबई आग्रा महामार्ग क्रमांक ३ वर एका इसमास आवाज देवुन त्यास थांबवुन तु भुषण ला का मारले असे बोलून त्याचे डोळयात मिरीचीची पावडर टाकुन त्याचे शर्टच्या खिशातुन एक मोबाईल काढुन घेवुन त्यास ढकलुन देवुन त्याचेकडील सुपर स्प्लेंडर मोटार सायकल ही जबरदस्तीने हिसकावुन घेतलेली होती असे सांगितलेने पश्चिम देवपुर पोलीस ठाणे येथे संपर्क साधुन अभिलेख तपासणी केली असता त्याबाबत पश्चिम देवपर येथे भाग ५ गुन्हा रजि नं २३४ / २०२३ भादंवि कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दिनांक १०/०८/२०२३ रोजी दाखल असलेचे दिसुन आले.


२) दिनांक १३/०८/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास नगाववारी येथुन चोरलेल्या सुपर स्प्लेंडर या दुचाकीवर ट्रीपल सिट बसुन गरताड गावचे शिवारातील तिखी फाटा येथे येवुन एका इसमास दुचाकीवरुन खालीपाडुन त्याचेवर गावठी बनावटीचे पिस्तोल रोखुन त्यास शिवीगाळी व दमदाटी करुन त्याचेकडुन एक मोबाईल, एक होडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी मोटार सायकल व रोख रक्कम असे जबरदस्तीने हिसकावलेले होते असे सांगितलेने मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे संपर्क साधुन अभिलेख तपासणी केली असता त्याबाबत मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे भाग ५ गुन्हा रजि नं २९७ / २०२३ भादंवि कलम ३९२, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दिनांक १४/०८/२०२३ रोजी दाखल असलेचे दिसुन आले.


३) दिनांक १४/०८/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास तिखी फाटा येथुन चोरलेल्या युनिकॉर्न मोटार साकलचा वापर करुन साक्री रोड हायवे वरील मोराणे गावचे बस स्टॉप जवळ एक पुरुष व एक महीला यांना गावठी पिस्तोलचा धाक दाखवुन त्यांचे डोळयात मिरचीची पावडर फेकुन त्यांचे जवळील दोन मोबाईल, सोन्याचे मंगळसूत्र असलेली काळया मन्यांची पोत व रोख रक्कम असे बळजबरीने हिसकावुन चोरी करुन पळुन गेलेलो होतो असे सांगितलेने धुळे तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क साधुन अभिलेख तपासणी केली असता त्याबाबत धुळे तालुका पोलीस ठाणे येथे भाग ५ गुन्हा रजि नं ४७३ / २०२३ भादंवि कलम ३९२, ५०६, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दिनांक १५/०८/२०२३ रोजी दाखल असलेचे दिसुन आले.


नमुद आरोपीत यांचेकडुन पश्चिम देवपर पोलीस ठाणे, धुळे तालुका पोलीस ठाणे व मोहाडी नगर पोलीस ठाणे


येथे दाखल असलेले तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले असुन त्यांचेकडुन


१) आझाद नगर पोस्टे कडील दाखल गुन्हयातील मिळुन आलेला गावठी बनावटीचे पिस्तोल, एक जिवंत काडतुस,


तिन मोवाईल, व एक्टीवा मोटार सायकल असा एकुण १,०६,०००/- रुपयेचा


२) पश्चिम देवपुर पोस्टे येथे दाखल गुन्हयातील एक सुपर स्प्लेंडर दुचाकी वाहन क्रमांक एम एच २८ ए एच ०५०३ व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकुण ३७,०००/- रु रकमेचा ३) मोहाडी उपनगर पोस्टे. येथे दाखल गुन्हयातील एक होड़ा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी मोटार सायकल वाहन क्रमांक एम एच ०६ ए व्ही ७९९३ व एक रिअल मी कंपनीचा मोबाईल असा एकुण ७७,०००/- रु रकमेचा


४) धुळे तालुका पोस्टे येथे दाखल गुन्हयातील दोन मोबाईल व सोन्याचे मंगळसूत्र असलेली काळया मन्यांची पोत मधील दोन वाटया असा एकुण २४,५००/- रु रकमेचा असा एकुण २,४४,५००/- रुपये रकमेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. नमुद आरोपीत यांना दिनांक १६/०८/२०२३ रोजी मा न्यायालयासमोर हजर केले असता मा न्यायालयाने दिनांक


२८/०८/२०२३ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे.


सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री संजय बारकुंड साो, मा अपर पोलीस अधिक्षक श्री किशोर काळे सो व मा सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ऋषीकेश रेड्डी सो. तसेच पोनि नितीन देशमुख यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, सहा फौज प्रकाश माळी, पोहवा/योगेश शिरसाठ, पोहवा / मुक्तार मन्सुरी पोना/गौतम सपकाळे, पोना/संदीप कढरे, पोना/ योगेश शिंदे, पोकॉ/ अनिल शिंपी, पोकों / अझरोददीन शेख, पोकों/सचिन जगताप, पोकों/पंकज जोंधळे, चालक / हरिष गोरे यांनी केलेली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने