सातपुड्याच्या डोंगरावर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पाच हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे
शहादा, ता.१६ :
वृक्षतोड वाढल्याने दिवसेंदिवस वनसंपदा नष्ट होत आहे. हिरवेगार असलेले डोंगर उघडे बोडके झालेले दिसत आहेत. त्यामळे सुरक्षेचा भार असतानाही जिल्हा पोलीस दलाने गत वर्षी त्याच्या अमृत महोत्सवी वर्षात एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता .त्यातील ७५ हजार वृक्षांची लागवड झाली आहे. असून यंदा हा संकल्प पूर्णत्वास येत आहे . भविष्याचा वेध घेऊन येणाऱ्या पिढीने निसर्ग संपदा जोपासावी. दरवर्षी एका व्यक्तीने १० झाडे जगवल्यास लवकरच सर्वत्र हिरवाईने नटलेले दृश्य दिसेल. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले.
दरा (ता. शहादा) परिसरातील सातपुड्याच्या डोंगरावर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पाच हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम म्हसावद पोलीस ठाण्यांतर्गत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पाटील बोलत होते. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे, शहादा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले, वृक्ष संवर्धन प्रतिष्ठानचे प्रा. ज्ञानी कुलकर्णी,वनपाल श्री मेढे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्यार पाटील म्हणाले की पोलीस दलावर सुरक्षेचा भार असताना निसर्गाचा लहरीपणा पाहून वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम सुरू केला संपूर्ण जिल्हा हिरवाईने कसा बहरेल यासाठी केवळ वृक्ष लागवड न करता 90% झाडे जगविण्याची उद्दिष्ट देखील पूर्णत्वास आणले आहेत भविष्यात वृक्ष लागवड केवळ उपक्रम राहता चळवळ म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने वृक्ष लागवड व संगोपन करण्याचे आवाहनही त्यांनी केले
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंखे म्हणाले की, पोलीस विभागाने आदर्श उपक्रम सुरू केला आहे. याचा आदर्श इतर विभागानेही घेऊन वनविभागास सहकार्य करावे. वृक्ष लागवडीसाठी पुढे येणाऱ्या व्यक्ती संस्था यांना वनविभाग निश्चितच सहकार्य करेल. वृक्ष लागवड कार्यक्रम हा उत्सवाप्रमाणे साजरा केला गेला पाहिजे.दरा परिसरात पोलिस दलाने लागवड केलेल्या वृक्षांच्या सांभाळ करण्यासाठी एका वनमजुराची नेमणूक वनविभागातर्फे करण्यात येईल.
असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबालाल पाटील यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी मानले. यावेळी उपस्थित मान्यवर, पोलीस विभाग, वन विभाग ,ग्रामस्थ, विद्यार्थी व वनप्रेमींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दरा सरपंच अलका पवार, रणजित रहासे,
आडगावचे पोलीस पाटील गौतम खर्डे,लक्कडकोट चे सखाराम रावताळे, पोलीस उपनिरीक्षक बडगुजर,तलावडीचे मोहन रावताळे, वृक्ष संवर्धनचे प्रा. संपत कोठारी,ऍड. गोविंद पाटील, किशोर पाटील, के. के. सोनार, सुधाकर पाटील, चतुर पाटील, माजी नगरसेवक रियाज कुरेशी, आरिफ पिंजारी ऍड. राजेश ठाकरे आदींसह परिसरातील नागरिक, महिला, विद्यार्थी, अनरद (ता. शहादा)येथील मिलिटरी स्कूल चे विद्यार्थी ,पोलीस दल, वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
