इंदापूर शहरातील वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गडी संवर्धन, व चांदशावली दर्गा संवर्धनचा प्रश्न इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नामुळे सुटणार
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे :वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढी संवर्धन व चांदशावली दर्गा संवर्धन व सुशोभीकरण संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह बैठक आयोजित करण्यात आली होती
या आराखड्याबाबत अजित पवार यांनी सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चांदशावली बाबांच्या दर्गाच्या परिसर जागेची माहिती व सद्यस्थिती व काय आहे व काय करण्यात येईल हेरिटेज दर्जा पद्धतीने सुशोभीकरण करण्याच्या सूचना केल्या ,तसेच जुन्या काळातील इतिहास नव्या पिढीला कळावा याबाबतची याबाबत पुरातत्त्व विभागाकडून माहिती इतिहासाची माहिती घेऊन त्याचा बाबत अहवाल जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण आराखडा तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना करून आवश्यक निधीची उपलब्धता करण्यात येईल असे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी पुणे यांनी आराखडा तयार करून वित्त व नियोजन विभागाकडे सादर करावा याबाबतच्या सूचनाही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी बैठकीप्रसंगी केल्या.
यावेळी या बैठकीसाठी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे,मुख्य सचिव वित्त विभाग अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग डॉक्टर नितीन करीर ,नगर विकास विभाग प्रधान सचिव डॉ गोविंदराज साहेब प्रधान, सचिव पर्यटन श्रीमती राधिका रस्तोगी मॅडम, व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी पुणे डॉक्टर राजेश देशमुख ,जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, इंदापुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री बाळासाहेब ढवळे, शिवप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते श्री भारत जामदार,आझाद पठाण, ओंकार साळुंके हे बैठकीप्रसंगी उपस्थित होते.
