सुतगिरणी कामगारांना न्यायाची प्रतिक्षा;सातव्या दिवशीही बेमुदत संप सुरूच!*
*एमडी राजाराम पाटील यांची मागण्यांबाबत चाल ढकल!*
शहादा: दिनांक २२/०८/२०२३ पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुतगिरणीतील कामगारांनी सुरू केलेला बेमुदत संप सातव्या दिवशीही सुरूच आहे.५ महिन्यांचा पीएफ भरणार,इंडेक्स नंबर लावणार, चालू वर्षांचा बोनस सप्टेंबर ८ ते १० तारखेला देणार,सप्टेंबर महिन्यापासून एक पगारी रजा लावणार, हजेरी प्रमाणे स्केल कायम करणार अशा ५ मागण्या पूर्ण करण्याचे तोंडी आश्वासन एमडी राजाराम पाटील यांनी आम्हाला दिले आहेत, याव्यतिरिक्त आमच्या इतरही मागण्या आहेत,सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाहीत,असे कामगार सांगत आहेत,अशी माहिती सुतगिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष जगन निकुंभ यांनी दिली.
एमडी राजाराम पाटील हे आम्हाला पीएफ देतो,बोनस देतो असे वर्षांनुवर्ष खोटे बोलतात, आमचा एमडीच्या बोलण्यावर विश्वास नाही,असे काही कामगार म्हणाले.एमडी आमच्या मागण्यांबाबत चाल ढकल करत आहेत, तरी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाहीत, असा निर्धार कामगारांनी केला आहे.
अभी नही तो कभी नही,हम अपना हक मांगते नही किसीसे भिख मांगते,कामगार युनियन जिंदाबाद,हमारी मांगे पूरी करो, कोण म्हणतो देणार नाही,घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशा जोरदार घोषणा कामगारांनी दिल्या.
