लुपिन फाउंडेशन तर्फे बालमजूरी जनजागृती कार्यक्रम दोडाईचा(अख्तर शाह)

 लुपिन फाउंडेशन तर्फे बालमजूरी जनजागृती कार्यक्रम

दोडाईचा(अख्तर शाह) 



दिनांक-:१८/०८/२०२३ रोजी लुपिन ह्युमन वेलफेअर & रिसर्च फाउंडेशन धुळे INMH 62 शिंदखेडा पियु BCI प्रकल्प अंतर्गत विखरण गावात केंद्रीय निवासी आदिवासी मुलींची आश्रम शाळा येथे धुळे जिल्हा व्यवस्थापक सुनील सैदाने सर, जिल्हा समन्वयक चंदन टोकशा , प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील सर, आणि पियु व्यवस्थापक श्री चेतन बोरसे सरांच्या मार्गदर्शनाखाली बालमजूरी प्रतिबंध कार्यक्रम घेण्यात आला

प्रथम गावात बालमजूरी जनजागृती रॅली काढण्यात आली

श्री महेंद्र गिरासे सर यांनी मुलींना बालमजूरी विषयी मार्गदर्शन केले  व मुलींची मानवी साखळी तयार करुन बालमजूरी थांबवा हे नाव तयार करून बालमजूरी जनजागृती चा संदेश देण्यात आला

सर्व मुलींना Best of luck किट वाटप करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले व शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही ह्याची दक्षता घेऊन शाळा शिकून आपली स्वप्ने पुर्ण करण्यास मार्गदर्शन केले.

शिंदखेडा कृषीमित्रा कढून मुलींना अल्पोहार म्ह्णून पारले बिस्किट पुडे वाटप करण्यात आले

यावेळी कार्यक्रमाला  शाळेचे चेयरमन,मुख्याध्यापक शिक्षक शिंदखेडा पियु चे सर्व कृषीमित्र  उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने