बायकोने घेतले नाहीत, एवढे किस कार्यकर्त्यांनी घेतले – अजित पवार प्रतिनिधी दत्ता पारेकर

 


बायकोने घेतले नाहीत, एवढे किस कार्यकर्त्यांनी घेतले – अजित पवार


प्रतिनिधी दत्ता पारेकर 


पुणे:अजित पवार बारामतीत त्याच्या स्वागत सभेत बोलताना म्हणतायत, एवढी रेटारेटी, एवढी गर्दी मला भेटण्यासाठी या आधी आयुष्यात कधी पाहिली नाही, अनेकांनी हातात हात घेतले, ढकला ढकली होत होती, हातात हात असताना कार्यकर्ते म्हणत होते, दादा सोडा, व्हढत्यायत, ढकलतायत, काहींनी तर किसच घेतले, है रे पठ्ठ्या, बायकोने घेतले नाहीत, एवढे किस कार्यकर्त्यांनी घेतले. अजित पवार यांचा हा दिलखुलास अंदाज आता बारामतीत दिसून आला. त्यांनी मनमोकळेपणाने बारामतीकरांनी केलेल्या स्वागताला उत्तर देताना अशा शब्दात दाद दिली.

बारामतीत अजित पवार आज दाखल झाले आहेत, त्यांची स्वागत सभा सुरु असताना एका कार्य़कर्त्याने जोरदार घोषणाबाजी त्यांच्यासाठी केली, कार्य़कर्त्यांनी एकच वादा, अजितदादा ही घोषणाबाजी सुरु ठेवली, या दरम्यान मिश्किल अजितदादा यांच्यातला मिश्किलपणा पुन्हा जागृत झाला आणि एकच वादा अजितदादा या घोषणेला उत्तर देताना म्हणाले, राहू दे, राहु दे, जोर राहु दे ... उद्याच ये आणि एजन्सी याला देऊन टाका

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने