भिमाई आश्रमशाळेत स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. इंदापूरची कन्या कु. तेजस्विनी उकिरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. प्रतिनिधी दत्ता पारेकर



 भिमाई आश्रमशाळेत स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. 


 इंदापूरची कन्या कु. तेजस्विनी उकिरडे  यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.


प्रतिनिधी दत्ता पारेकर


 पुणे: इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्य. आश्रमशाळा व मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सकाळी ठीक ८:०५ वा. साजरा करण्यात आला.

 

यावेळी इंदापूरची कन्या कु. तेजस्विनी उकिरडे यांनी सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


तदनंतर संस्थेच्या अध्यक्षा मा. शकुंतला मखरेंनी ध्वजपूजन केले तर कु. तेजस्विनी उकिरडे यांच्या हस्ते (दि.१५) ध्वजारोहण  करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे , संचालक राहुल सवणे, गोरख तिकोटे, संजय कांबळे, गणेश महाजन, अविनाश कोथमिरे, भास्कर साळवे (पुणे),शिवाजीभाऊ चंदनशिवे, अश्वजित कांबळे, गोरख चौगुले,प्रशांत मखरे, शीतल पलंगे, नंदू अडसूळ,युवराज दणाणे, तसेच मुख्याध्यापक, प्राचार्या, शिक्षक,प्राध्यापक, अधिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.तर आभार हिरालाल चंदनशिवे यांनी मानले. भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिनच उत्साहात संपन्न झाला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने