नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक गुरुजींनी विद्यार्थ्यांना दिले निसर्गाशी मैत्री करण्याचे धडे
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील गुरुजींनी पानबारा शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्गाशी मैत्री करण्याचे धडे देत आपल्या मनोगतातून वृक्ष आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत. वृक्षामुळे जीवनात किती फायदे होतात यामुळे निसर्गाशी मैत्री करा... असे आवाहन विद्यार्थ्यांना करुन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आपल्या पदाचा कोणताही अभिमान न बाळगता मुलांसोबत चक्क खाली बसून विद्यार्थ्यांसोबत हितगुज केली. यावेळी निसर्गरम्य डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पानबारा शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
शालेय प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजनाबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शालेय प्रशासनाची प्रशंसा केली. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस जी पवार यांचे देखील शालेय प्रशासन नियोजनाबाबत त्यांच्यावर स्मृती सुमन उधळले.
नंदुरबार जिल्ह्यात एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून पानबारा शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत हजारो वृक्षांची लागवड करण्यास येणार आहे. याप्रसंगी वृक्षारोपणासह वृक्षदिंडी काढून कार्यक्रम साजरा करण्यात आला ..यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी संजय महाजन, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार, खानापूर ग्रामपंचायत सरपंच प्रियंका गावित, उपसरपंच देवजी गावित व परिसरातील पोलीस पाटील, ग्रामस्थ, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उपस्थित कार्यक्रम साजरा झाला.
शासकीय माध्यमिक आश्रम पानबारा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पोलीस अधीक्षक यांचे स्वागत लेझीम पथकाने तसेच आदिवासी पद्धतीने स्वागत केले. तसेच वृक्षदिंडी काढत कार्यक्रमाला सुरुवात केली.
यावेळी आदिवासी कुलदैवत देव मोगरा मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच श्रीफळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात केली...
गेल्या वर्षी पानबरा आश्रम शाळेतील लॅपटॉप चोरीला गेले होते ते मिळवून दिल्याबद्दल कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांचे विद्यार्थ्यांनी आभार मानत लॅपटॉप चोरीचा उलगडा लवकर लावल्याने विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.
