जि.प.च्या असली शाळेत गणवेश वाटप
शिरपूर - धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा अंतर्गत गणवेश वाटपाचा पहिला टप्पा सुरू झाला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जात आहे.
जिल्हा परिषद मराठी शाळा असली येथे दिनांक 11/ 8/ 23 रोजी शाळेतील मुलांना टप्पा क्रमांक एक गणवेश वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राहुल ईशी व उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री सुनील कोळी मुख्याध्यापक श्री जितेंद्र राजपूत सहशिक्षिका श्रीमती वैशाली भामरे श्रीमती निता गीते हे उपस्थित होते.
