सयुक्त किसान मोर्चा व किसान सभेतर्फै शिरपुर येथिल प्रांत कार्यालयावर मोर्चा मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन




शिरपूर - संयुक्त किसान मोर्चा व किसान सभेतर्फे शिरपूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली असून यात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन किसान सभेतर्फे करण्यात आले आहे.

संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी विरोधी  तीन काळे कायदे रद्द करावेत त्याच बरोबर शेतीतील उत्पादीत पिकांचा हमी भावाचा कायदा करावा,
विज विधेयक बिल २०२० रद्द करावा इत्यादि मागण्यासाठी दिल्ली येथे ३८२ दिवस ओंदोलन केले.परंतु केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्द करताना ‌.संयुक्त किसान मोर्चाला दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने सदरच्या मागण्या मान्य करण्यासाठी खालील मागण्यांसाठी किसान सभा भव्य मोर्चा काढून शासन दरबारी खालील मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन देणार आहेत.


१)हमी भावचा कायदा करणार.!
२)विज विधेयक २०२२ रद्द करणार!
३) चार शेतकरी व एक पत्रकार याची हत्या करणारे मुख्य सुत्रधार गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांना मत्रिंमंडळातुन बरखास्त करा!
४)पिकांचा नुकसान भरपाईसाठी  प्रभावी पिक विमा लागु करा!
५)अल्पभुदारक,मध्यम शेतकर्यांनाव शेतमजुरांना ५०००/रुपये पेन्शन योजना. लागु करा!
६)शेतकरी आदोंलना दरम्यान ८० हजार शेतकर्यावरील दाखल गुन्हे मागे घ्या!
७) शेतकरी आदोंलना दरम्यान शहिद ओदोंलनकारी परीवाराला नुकसान भरपाई देऊन .पुनर्वसन‌करा!
८) किसान स्मारक बनिवणण्यासठी सिंधु बाॅडवर जागा द्या!
या प्रमुख मागण्या बरोबर स्थानिक मागण्या.
९)कापसाला प्रती क्विटंल १२०००/रुपये भाव द्या!
१०)कर्ज माफीपासुन वंचित शेतकर्याना त्वरीत कर्ज माफी द्या!
१०) आदिवासी.व सामन्य जनतेला. त्वरीत न्याय मिळण्यासाठी.शिरपुर न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायालय.सि .डीव्हिजन. हे न्यायालय सुरु करा!
११)शिरपुर येथिल दुय्यम निबंधक कार्यालय जुने तहसिल कार्यालयात स्थलांतरीत करा!
१२)जे.फार्म धारकांना त्वरीत ७/१२ चे  वाटप करण्याची प्रक्रीया सुरु करा!
१३)वनजमीन दावेदारांना नामजुंरअपिलांचे.म.जिल्हाधिकारी साहेबा कडे रिव्हजन अर्ज दाखल करून दावेदाराला त्याची बाजु मांडण्याची संधी द्या.ते कामकाज शिरपुर प्रांत कार्यालयात चालवा!

यासह इतर मागण्यांसाठी 
दिनांक २५/१/०१/२०२३ रोजी रामदवजी बाबा मंदीर अमोदे येथुन दुपारी ठीक १ वाजता मोर्चाला सुरुवात होईल.दुपारी ३ वाजता मोर्चा प्रांत कार्यालयावर पोहचेल.म.जिल्हाधिकारी धुळे यांना  व्दारा उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिले जाईल.
तरी शिरपुर तालुक्यातील शेतकरी ,शेतमजुर.संयुक्त किसान मोर्चात सामिल संघटना व पक्ष.वकील बंधु भगिनींनी हजर राहावे अशी विनंती.संयुक्त किसान मोर्चा व किसान सभा.अँड .हिरालाल परदेशी .
प्रदेशध्याक्ष .म.रा किसान सभा. यांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने