पुण्यात विवाहिता सोन्याच्या आमिषाला भुलली अन जीवाला मुकली प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:एका विवाहित प्रेयसीची तब्बल 35 वेळा वार करून हत्या करण्यात आली आहे. पुणे येथून आरोपीने तिला टिटवाळा येथे नेले होते आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला. आपल्याला सोन्याचा खजिना सापडलेला आहे हे असे सांगत त्याने त्याच्या विवाहित प्रेयसीला सोबत येण्याचा आग्रह केला आणि त्यानंतर टिटवाळा येथे आल्यानंतर तिचा खून केला.

उपलब्ध माहितीनुसार, जयराम उत्तरेश्वर चौरे असे आरोपीचे नाव असून या प्रकरणात सुरज गोलू घाटे असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील रहिवासी असून रुपांजली संभाजी जाधव असे मयत महिलेचे नाव आहे. मयत महिला ही आरोपी जयराम याला सतत लग्नासाठी तगादा करत होती मात्र त्याला लग्न करायचे नसल्यामुळे त्याने तिचा लग्नाचा ससेमिरा टाळण्यासाठी तिला आपल्याला सोन्याचा खजिना सापडलेला आहे असा बहाणा करत पुण्यातून आपल्यासोबत घेतले आणि त्यानंतर ते टिटवाळा येथे पोहोचले आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.


25 डिसेंबरला टिटवाळा येथे गोवेली जंगल परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या शरीरावर तब्बल 35 वार करण्यात आले होते त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि शवविच्छेदन अहवालावरून तिची हत्या ही अंदाजे 12 डिसेंबर रोजी घडल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ कलम 302 201 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे शिंगटे यांच्या पथकाने अज्ञात आरोपी चा तपास सुरू केला त्यावेळी मयत महिलेच्या जवळ एक आधार कार्ड आढळून आले होते पोलिसांनी त्यानंतर त्या आधार कार्ड वरून इंस्टाग्राम वर महिलेचा मित्र आणि इतर व्यक्तींची चौकशी केली त्यावेळी तिची ओळख पटली आणि पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला


महिला मयत महिला हिचे जयराम नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुरावे जुळवले आणि आरोपीच्या शोधात चाकण पुणे आणि बीड या ठिकाणी पथके पाठवली आणि त्याला बेड्या ठोकल्या. मयत रुपांजली ही तिचा पती आणि तीन मुलांसोबत राहत होती मात्र तिचे आरोपी याच्यासोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू झाले होते. त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध देखील प्रस्थापित झाले आणि त्यानंतर रुपांजली हिने जयराम याला लग्नासाठी तगादा सुरू केला त्यानंतर त्याने लग्न करायचे नसल्या कारणाने तिची हत्या करण्याचा प्लॅन केला.

आरोपी याने तिला आपल्यासोबत घेण्यासाठी टिटवाळा येथे आपल्याला सोन्याचा खजिना सापडलेला आहे आपण तो घेऊन येऊ असे सांगत तिला आपल्यासोबत घेतले. त्याचे तुला त्या सोन्याचे दागिने घेऊन देईल असे देखील तो म्हणाला त्यामुळे विवाहित असलेली ही महिला देखील त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. टिटवाळा येथील गोवेली जंगलात आल्यानंतर आरोपीने तिचा खून केला आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी अखेर गुन्ह्याची उकल करत मयत महिलेच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने