शिंदखेडा— दि.१७/१/२०२३ रोजी अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहात किर्तन होळी चौक पिंप्राळ येथे *किर्तनकार ह.भ.प.अतुल महाराज नारणेकर* यांचे आपल्या मधुर वाणीतुन सर्व भक्तांना संसाराचे दाखले देत मंत्रमुग्ध करुन घेतले या किर्तनास पिंप्राळ ,धांदरणे,जुने भामपुर, कंचनपूर पाठशाला बाल कलाकार,शिंदखेडा या भजनी मंडळींनी साथ दिली तसेच उंटावद,खर्दे पार्थडे,बाभुळदे,श्रीराम मंदीर,वरवाडे,सावळदे,भटाणे,वाघाडी,तर्हाडकसबे भजनी मंडळी उपस्थित होते तसेच किर्तना नंतर महंत सतिषदास भोंगे महाराज,भागवतकार ह.भ.प. प्रमोद भोंगे महाराज ,शिरपुर माजी नगरसेवक संतोष माळी यांचा ग्रामस्थांमार्फत विशेष सन्मान करण्यात आला या किर्तनास तरुण वर्ग व विशेष भक्त महिलांचा जास्त सहभाग होता व ह.भ.प.नाना महाराज नरडाणाकर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे तसेच प्रत्येक गावाची भजनी मंडळीस श्रीफळ देण्यात आले
Tags
news
