ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा (प्र. न.)ता.शिंदखेडा जि धुळे येथे स्वराज्य संस्थापिका राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव , स्वामी विवेकानंद यांची जयंती व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लोकनेते डॉ. नानासाहेब हेमंतरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण संस्थेत दिनांक 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत संस्थेचे संचालक अमितदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
याप्रसंगी विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय मुख्याध्यापिका श्रीम. पी.पी. महिरे- वाघ यांच्या सुयोग्य नियोजनाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून वक्तृत्व काळाची गरज आहे असे मत आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी राज्य आदर्श शिक्षक श्री एन.पी. भिलाने यांनी सुखी जीवनाचे सूत्र या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उत्साह पूर्ण वातावरण निर्मिती केली.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत मला आवडलेली कथा, व वक्तृत्व काळाची गरज आहे या विषयांवर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यासाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. सी .झेड. कुवर व श्रीमती मंगला कुवर . क्रिकेट स्पर्धेसाठी श्री. एस. एस. पाटील, चित्रकला स्पर्धेसाठी श्री ए.के .सावंत, रांगोळी स्पर्धेसाठी श्री पी.एच. लांडगे व श्री नितीन विलासराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री जितेंद्र राजपूत, दिलीप पाटील ,चुडामन धनगर मेहनत घेत आहेत.
