नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने स्थापन केले स्वतंत्र पथक...!! नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे



    नंदुरबार जिल्हा लगत असलेल्या गुजरात राज्यासह संपुर्ण भारतात मकरसंक्रांतीचा पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पतांगोत्सावाचा आनंद घेण्यासाठी लहानांपासुन थोरल्यांपर्यत सर्वच नागरिक घेत असतात. जिल्ह्यतील विविध शहरांमध्ये पतंग व मांजा विक्रेत्यांनी आप-आपली दुकाने मांडलेली असतात. पतंगोत्सव साजरा करतांना डी.जे. व स्पिकर लावुन मोठ-मोठ्याने गाणे लावुन नृत्य करतांना आपण बघत असतो, परंतु सण साजरा करुन आपली संस्कृती टिकवत असतांना पर्यावरणाची काळजी व सांभाळ करणे हे देखील सर्व सामान्य नागरीकांचे एक कर्तव्य आहे. पतंगोत्सव साजरा करतांना नायलॉन मांजा वापरामुळे निसर्गातील बरेच पशु, पक्षी वेळप्रसंगी लोकांना दुखापत होवुन आपला जिव देखील गमवावा लागला आहे, असे अनेक उदाहरण आपण वर्तमानपत्र किंवा प्रसारमाध्यमांद्वारे बघत असतो. अशा प्रकारच्या पतंग उडविण्याच्या धाग्यामुळे प्राणघातक इजांपासुन पक्षी व मानव जिवितांस सरंक्षण करण्याची गरज आहे.अशा दुर्मिळ व नष्टप्राय होत असलेल्या निष्पाप पक्षांचे सरंक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.

 

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.

 

      तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील यांनी वेळोवेळी कृत्रीम वस्तूपासुन बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याचा सणाच्या वेळी बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच नायलॉन मांजाची किरकोळ विक्री किंवा प्रमुख विक्रेत्याचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्यात येईल असे आवाहन केले होते. तरी देखील नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुध्द नंदुरबार जिल्हा घटकात नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे 04 गुन्हे, उपनगर पोलीस ठाणे येथे 01 गुन्हे, शहादा पोलीस ठाणे येथे 02 गुन्हे, तळोदा पोलीस ठाणे येथे 02 गुन्हे असे एकुण 09 नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करून 31,090/- रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलेला आहे.

 

      पतंग उडवितांना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जिवीत हानी होणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, प्लॅस्टीक किंवा तर कृत्रीम वस्तूपासुन बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याचा सणाच्या वेळी बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच नायलॉन मांजाची किरकोळ विक्री किंवा प्रमुख विक्रेत्याचा शोध घेवुन त्यांचेवर पर्यावरण (सरंक्षण) अधिनियम 1986 च्या कलमान्वये कारवाई करण्यात येईल. त्याचप्रकारे ज्या वस्तूंपासुन पर्यावरणास हानी पोहचेल असेल असे नायलॉन मांजाची विक्री, साठवणुक किंवा हाताळणी करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल तसेच नायलॉन मांजा विक्री हाताळणी करतांना आढळुन आल्यास त्वरीत नंदुरबार जिल्हा पोलीस घटकात खालील प्रमाणे तयार करण्यात आलेले कारवाई पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार 02564-210100/210113 यावर संपर्क साधावा असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी केलेले आहे.

अ.क्र.

पोलीस ठाणचे नाव

पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे नाव

मोबाईल क्रमांक

1)      नंदुरबार शहर

पोउनि/एस.बी.आहेर

8788980694

पोकॉ/622 श्रीकांत पाटील

9049947679

पोकॉ/429 शैलेंद्र माळी

9423905861

2)   नंदुरबार तालुका

पोउनि कमलाकर चौधी

9011009599

पोकॉ/226 सचिन सैंदाणे

9172599555

पोकॉ/848 मयुर गवळी

8329335892

3)      उपनगर पोउनि प्रविण कोळी

8380922273

पोना/180 निलेश पाटील

9881018657

पोकॉ/1260राकेश चौधरी

8087422374

4)    नवापूर

पोउनि मनोज पाटील

7588517878

पोहेकॉ/120निजामसिंग पाडवी

9764169106

पोना/1375 विनोद पराडके

7741907007

पोकॉ/  दिनेश बाविस्कर

9689366388

5)      विसरवाडी

पोउनि दिलीप गावीत

8408933305

पोकॉ/670 भोजराज धनगर

9921871057

पोउनि भूषण बैसाणे (खांडबार)

9420023821

पोहेकॉ/298 सुरेश मोरे

96036920767

6)      अक्कलकुवा

पोउनि जितेंद्र महाजन

8698117332

पोकॉ/1240 अविनाश ठाकरे

96074272369

पोकॉ /237 गिरीश सांगळे

7820832024

7)      तळोदा

सपोनि अविनाश केदार

9594969123

पोहेकॉ/972 सुधीर गायकवाड

7798078100

पोना/965 हर्षल साळुंखे

9765095179

8)  मोलगी

 सपोनि धनराज निळे

9823715077

पोना/411 राजेंद्र गावीत

9423163850

पोकॉ/761 संतोष राठोड

7588048855

9)      शहादा

पोउनि जितेंद्र पाटील

9484489652

पोशि/06 अजीतसिंग नागलोत

7776876143

पोशि/600 दिनकर चव्हाण

9822887763

10)  सारंगखेडा

पोउनि भगवान कोळी

9766001165

पेाना/132 ठाणसिंग राजपूत

9604548964

पोना/515 राजू वळवी

7798804462

11)  म्हसावद

पोउनि किशोर बडगुजर

885695926

पोना/1038 अजीत गावीत

9767185662

पोशि/330 राकेश पावरा

9405175447

12)  धडगाव

पोउनि राहूल पाटील

7900102500

पोना/1117 शशिकांत वसईकर

9011551984

पोना/198 मनोज महाजन

7277887373

13)  स्थानिक गुन्हे शाखा

सपोनि संदीप पाटील

9821528718

पोउनि अनील गोसावी

9423194709

पोहेकॉ/107 राकेश वसावे

9922521007

पोहेकॉ/522 महेंद्र नगराळे

8208225047

पोहेकॉ/884 दिपक गोरे

9881033010

पोना/662 राकेश मोरे

7507605096

 

 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने